आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माथेफिरू चालक संतोष माने दोषीच; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बेदरकारपणे एसटी चालवून नऊ जणांचे बळी घेणारा माथेफिरू चालक संतोष माने हा दोषी असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे व पी. डी. कोदे यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली. ज्या वेळी ही घटना घडली त्या वेळी आपण मानसिक रुग्ण असल्याचे सांगत मानेने या प्रकरणातून आपली मुक्तता करण्यासाठी याचिका दाखल केली होती. जानेवारी 2012 मध्ये मानेने बेदरकारपणे एसटी चालवून 9 जणांचे बळी घेऊन 35 जणांना जखमी केले होते. त्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने डिसेंबर 2013 मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले होते. मात्र, मानेने या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने माने हा दोषीच असल्याचा निर्वाळा दिला. आता याप्रकरणी 5 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.