आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santosh Mane Pune Accident Case Latest News In Marathi

संतोष मानेचा अपील अर्ज न्यायालयाने स्वीकारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भरधाव बस चालवून पुण्यात नऊ जणांना चिरडणारा एसटीचालक संतोष मानेचा अपील अर्ज गुरुवारी उच्च न्यायालयाने स्वीकारला. पुणे सत्र न्यायालयाने मानेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याला मानेने आव्हान दिले आहे.
मानेने 25 जानेवारी 2012 रोजी स्वारगेट बस स्थानकातून एक मोकळी बस बाहेर काढली होती. ही बस साधारण तासभर भरधाव वेगाने आसपासच्या परिसरात चालवत संतोष मानेने थैमान घातले होते. या घटनेत नऊ जणांचा बळी गेला होता, तर 37 जण जखमी झाले होते. पुणे सत्र न्यायालयाने या गुन्ह्यासाठी मानेला फाशीची शिक्षा सुनावली होती. पुणे सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आज उच्च न्यायालयात न्या. नरेश पाटील आणि न्या. अचलिया यांच्यासमोर मानेच्या वतीने अपील अर्ज सादर करण्यात आला.
हा अपिल अर्ज स्विकारत उच्च न्यायलयातर्फे 12 मार्चही तारीख पुढील कामकाजासाठी ठरवली असून यावेळी सुनावणीची तारीख निश्चित केली जाणार आहे.