आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarsanghchalak Mohan Bhagwat Life In Denger, Intellegence Department Warning

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जिवाला धोका; गुप्तचर विभागाचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सरसंघचालक मोहन भागवत दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असून त्यांच्या जीविताला मोठा धोका असल्याचे केंद्रीय गुप्तचर विभागाने (आयबी) गृहमंत्रालयाला दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. भागवत सध्या महाराष्‍ट्र दौ-यावर आहेत. त्यांच्या जिवाला अतिरेक्यांकडून धोका असून त्यांना अधिक सुरक्षा तैनात करण्यात यावी, असेही या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती राज्यातील ‘आयबी’च्या सूत्राने ‘दिव्य मराठी’ला दिली.
मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर विभागात मोहन भागवत यांचे सध्या दौरे चालू आहेत. या दौ-यात भागवत यांना सुरक्षा पुरवण्यासाठी मुंबई पोलिस दलातील बारा अधिकारी-कर्मचारी यांचे एक पथक त्यांच्या दिमतीला ठेवण्यात आले आहे.
देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे अतिरेक्यांची कारस्थाने वाढण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील रॅलीत घडवलेल्या बाँबस्फोटामुळे महाराष्‍ट्राचे पोलिस अधिक सतर्क आहेत. 27 मार्च 2012 रोजी औरंगाबाद येथे राज्य एटीएस आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत खलील कुरेशी हा दहशतवादी मारला गेला होता तसेच चौघा संशयितांना अटक झाली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील संघ मुख्यालय आणि मोहन भागवत अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे उघड झाले होते.