आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satara Devlai Finally In Aurangabad Municipal Corporation, Chief Minister Signed

सातारा-देवळाई अखेर मनपात; मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी, अधिसूचनाही जारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - औरंगाबाद मनपा शिवसेना-भाजपच्या ताब्यात रहावी या हेतूने नुकतीच अस्तित्वात आलेली सातारा-देवळाई नगरपरिषद औरंगाबाद महापालिकेत विलीन करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या संबंधीच्या फाईलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच रात्री उशीरा स्वाक्षरी केली. बुधवारी रात्री याबाबतची अधिसूचना जारी केल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली.

काही महिन्यांपूर्वीच अस्तित्वात आलेल्या या नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच सरकारने हा निर्णय घेतला. सातारा- देवळाई परिसर औरंगाबाद मनपात समाविष्ट करावा, असा शिवसेनेचा आग्रह होता. औरंगाबादचा पालकमंत्री या नात्याने मी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. मंगळवारी रात्री दोन वाजता फडणवीस यांनी या फाईलवर स्वाक्षरी केली. आता हरकती मागवून अंतिम प्रारूप प्रसिद्ध केले जाईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी `दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.