आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतीश शेट्टी हत्येचा तपास गडकरींमुळे थांबला, शेट्टींचे भाऊ संदीप यांचा सनसनाटी आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी याच्या हत्येचा सीबीआय करत असलेला तपास अंतिम टप्प्यात आला होता. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दबाव टाकून सीबीआयला या तपासाची फाइल बंद करण्यास भाग पाडले,’ असा आरोप सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेजवळील सरकारच्या मालकीची १८०० एकर जमीन आयअारबी कंपनीच्या नावावर झाली होती. माझा भाऊ त्याची माहिती गोळा करत होता. त्यामधूनच त्याची हत्या करण्यात आली. आमच्या मागणीमुळे हा तपास सीबीआयकडे गेला. अधिकाऱ्यांनी अतिशय मेहनत करून सर्व पुरावे गोळा केले होते. अधिकारी पुरावे न्यायालयात दाखल करणार होते, इतक्यात केंद्रात सत्ता परिवर्तन झाले. त्यानंतर महिन्यातच सीबीआयने शेट्टी प्रकरणाची फाइल बंद करत असल्याचे न्यायालयास सांगितले. कारण गडकरी यांनी सीबीआयवर दबाव टाकला होता. कारण शेट्टी प्रकरण म्हैसेकर यांच्या आयआरबी कंपनीवर शेकणार हाेते. या कंपनीने गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहाला १६० कोटींची मदत केली होती. त्या ची परतफेड करण्यासाठी गडकरींनी ही फाइल बंद करण्यासाठी सीबीआयवर दबाव टाकल्याचा आरोप संदीप शेट्टी यांनी केला.