आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा परतणार सट्टेबाजीचा हंगाम, आठ महिन्यांत 90 हजार कोटींचा सट्टा लागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) यावर्षीच्या पर्वामध्ये सट्टेबाजीचे भयानक वास्तव समोर आले. या प्रकरणामुळे नजरेत आलेले सट्टेबाज काही काळ भूमिगत झाले होते. पण ऑस्ट्रेलिया दौर्‍यामध्ये पुन्हा एकदा सट्टेबाजाराला जोर चढण्याची शक्याता आहे. त्यात पाच राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत.
त्यामुळे पुढच्या 8 महिन्यांत 80 हजार कोटींचा सट्टा लागण्याची शक्यता आहे.
एकमेव टी ट्वेंटी सामन्याने गुरुवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. याशिवाय मालिकेत सात वन-डे सामने होणार आहेत. संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात या मालिकेचा ज्वर असेल. त्यामुळे सट्टेबाज या काळात सक्रिय होणार आहेत. या एका महिन्याच्या कालावधीनंतर लगेचच निवडणुकांचा हंगाम सुरू होत आहे. त्यात पाच राज्यांच्या निवडणुकांवर सट्टेबाजांचे लक्ष लागलेले आहे. निवडणुकांच्या निकालाबरोबर कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचा कोण मुख्यमंत्री होणार यावरही मोठ्या प्रमाणावर सट्टा लागणार आहे. विधानसभा निवडणुकांचे वारे थंडावताच त्यानुसार लोकसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर होतील. राजकीय तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जर यूपीए सरकारला या निवडणुकांमध्ये यश आले, तर लगेचच लोकसभा निवडणुका घेतल्या जातील. तसे झाले नाही, तर निवडणुका एप्रिलपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांवर 30 हजार कोटींचा सट्टा लागण्याचा अंदाज आहे.