आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satyamev Jayate 2: Aamir Khan Brings The State Of Garbage Disposal

कचरा नाही, 27 हजार कोटी रुपयांचे खत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आपल्या देशात दररोज 1.60 लाख मेट्रिक टन कचरा निघतो. त्यामुळे हजारो एकर जमीन डंपिंग ग्राउंड बनली आहे. कचर्‍याचे 80 ते 100 फुटांचे डोंगर तयार झाले आहेत. हवा, पाणी प्रदूषित झाले आहे. आजार पसरत आहेत. पण हाच कचरा रिसायकल केला तर 27 हजार कोटींचे खत मिळू शकते. त्याच्या मदतीने 45 लाख एकर पडीक जमीन सुपीक होऊ शकते. 90 लाख टन अधिक अन्नधान्य मिळू शकते. दोन लाख गॅस सिलिंडर एवढा गॅस मिळू शकतो.

हा दावा आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या शोमध्ये करण्यात आला आहे. आमिरने देशभरातील कचरा व्यवस्थापनाबाबत चर्चा केली. शेतकरी डंपिंग ग्राउंडने त्रस्त झाल्याचे बंगळुरूचे अरुणकुमार म्हणाले. तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट पैसे उकळण्याचा प्रकार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ऋषी अग्रवाल म्हणाले. यात सगळ्यांचीच मिलीभगत असल्याचेही समोर आले. पुण्याच्या स्वच्छ या संस्थेशी संबंधित सरुबाई वाघमारे यांच्याशीही चर्चा केली. पुण्याच्या आरबीआयमध्ये कंपोस्टचा प्रकल्प त्या चालवतात. आंध्रचे आयएएस अधिकारी बी. जनार्दन रेड्डी आणि वारंगलचे महापालिका आयुक्त विवेक यादव यांनीही कचरा व्यवस्थापनासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांबाबत माहिती दिली.

कचर्‍याच्या नावाने सुरू असलेली लूट
1 कचरा गोळा करण्यावर मनपा प्रतिटन 200 ते 800 रुपये खर्च करते. ठेकेदारांना सरकारी जमीन देऊन तेथे कचरा टाकण्यासाठीही त्यांना हजारो कोटी रुपये दिले जातात.

2 मुंबईत 80 फुटांचा कचर्‍याचा डोंगर होता. 2003 मध्ये बॅक्टेरियाद्वारे एक हजार हेक्टर क्षेत्र स्वच्छ केले. 3 कोटी खर्च येतो. सरकारने त्यासाठी 69 कोटींचे कंत्राट दिले.

3 व्यावसायिक नुरियल पेराजकर म्हणतात, आम्ही कचरा घेऊन, गॅस तयार केला असता, वर महापालिकेला पैसेही दिले असते. पण त्यांनी नकार दिला. ते म्हणतात, आमच्याकडे कचराच नाही.

असा होऊ शकतो निपटारा
1 टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या कँटीनच्या कचर्‍यापासून मिथेन वायू तयार करून तोच कँटीनमध्ये वापरला जातो.

2 श्रीनिवासन चंद्रशेखरन यांचा कोइम्बतूरमध्ये प्रयोग. फळ, भाज्यांचा कचरा गायी खातात. 8 तासांत शेण तयार. त्यातून मिथेन काढल्यानंतर गांडूळ 72 तासांत त्याचे खत तयार करतात.

3 प्रा.आर.वासुदेवन यांनी प्लास्टीकपासून रस्ते तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. प्लास्टीकचे मिर्शण दग़ड-तारकोल यांना घट्ट बसवते. देशभरात असे प्रयोग व्हायला हवे.

..धोकादायक पाऊल
दक्षिण दिल्लीत कचरा जाळण्याचा प्रकल्प आहे. त्याने संधिवात, श्वसनाचे विकार आणि कॅन्सरचाही धोका संभवतो. 70 टक्के ओला कचरा असल्याने हे मॉडेल आपल्यासाठी योग्य नसल्याचे टॉक्सिक लिंकचे रवी अग्रवाल सांगतात. कारण ओला कचरा जाळल्याने डायऑक्सिन या धोकादायक वायूचे उत्सर्जन होते.

अशी सुधारेल परिस्थिती
1. प्रत्येक घरात ओल्या व कोरड्या कचर्‍यासाठी दोन स्वतंत्र डबे असावे.
2. ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट तयार करता यते. पर्यावरणाचे रक्षण होईल.
3. कोरडा कचरा रिसायकल करता येतो. त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा.

आजचा प्रश्न
आजपासून ओला व कोरडा कचरा वेगळा करून देश अधिक स्वच्छ सुंदर बनण्यासाठी मदत करणार का, असा प्रश्न आमिरने लोकांना केला.