आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यपालसिंह यांना म्हटले जात होते ‘प्रवचनवाले बाबा’, मोदींचे निटकवर्तीय व अमित शहांशीही सलोखा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेवानिवृत्त होण्यापूर्वी सत्यपाल सिंह यांना मुंबई पोलिस दलाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी सलामी  - Divya Marathi
सेवानिवृत्त होण्यापूर्वी सत्यपाल सिंह यांना मुंबई पोलिस दलाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी सलामी
मुंबई - चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थक, हिंदुत्वाचे अभिमानी, परंपराप्रिय आणि राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांच्या भाजपमधील प्रवेशाचा निर्णय अपेक्षितच असल्याची प्रतिक्रिया मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे.सत्यपाल मूळचे उत्तर प्रदेशातील मेरठचे. 1980 मधील आयपीएस. सिंह स्वत: ब्राह्मण नसले तरी चातुर्वर्ण्यचे जोरदार समर्थक. हिंदू धर्म त्यांच्या अभ्यासाचा खास विषय.
हिंदू धर्मावर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. सत्यपाल पुण्याचे पोलिस आयुक्त असताना कनिष्ठ जातीमुळे आपल्याला वाईट वागणूक दिली जात असल्याची खंत गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्याकडे व्यक्त केली होती. परंतु माध्यमांनी राजकारण्यांना न जुमानणारा अधिकारी असेच सत्यपाल यांचे सकारात्मक चित्र उभे केले होते. गुजरातमधील इशरत जहाँ चकमकप्रकरणी उच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष चौकशी दलाचे (एसआयटी) प्रमुख म्हणून काम करण्यास सत्यपाल यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला होता. तेव्हापासून मोदी यांचे सहकारी अमित शहा यांच्याशी सत्यपाल यांची चांगलीच गट्टी जमली होती. नागपूरचे आयुक्त असताना राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील मुख्य कार्यालयात त्यांचे सदोदित जाणे-येणे घडे.
प्रवचनवाले बाबा
विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया आणि दिवंगत सरसंघचालक के. सुदर्शन यांच्याशी सत्यपाल यांची खास मैत्री होती. मुंबईतील सत्यपाल यांच्या कार्यालयात हिंदुत्ववादी नेत्यांचा कायम राबता असायचा. अनेक धार्मिक कार्यक्रमांत ते सहभागी होत. पोलिस अधिका-यांनाही ते नेहमीच संस्कृतीचे डोस पाजत. त्यामुळे त्यांना ‘प्रवचनवाले बाबा’ असे म्हटले जाई. उच्च अधिकारी ज्या विचाराचा त्याच विचाराने खालचे अधिकारी काम करत असतात. सत्यपाल प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांच्या निवृत्तीमुळे मुंबई पोलिस दलातील कम्युनल वातावरण काही प्रमाणात निवळेल, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ अधिका-याने दिली.
निवृत्त झाल्याचा आनंदच
सत्यपाल सिंह पठडीबाज अधिकारी होते. कोणताही नवा दृष्टिोकोन त्यांच्याकडे नव्हता. सनातनी, कर्मठ विचारांच्या आहारी गेल्यामुळे नव्या समस्या ते जुन्या उत्तरांच्या साहाय्याने सोडवू पाहत असत, अशी प्रतिक्रिया त्यांच्याबरोबर राज्य गुप्तवार्ता विभागातील निवृत्त अधिका-याने दिली. भारतीय राज्यघटनेशी प्रतारणा करत एखाद्या धार्मिक प्रवाहाशी, विचारसरणीशी घरोबा ठेवणारे सनदी अधिकारी जेवढ्या लवकरात लवकर निवृत्ती स्वीकारतील तेवढे चांगले. त्यामुळे सत्यपाल सिंह यांच्या निवृत्तीमुळे अत्यानंदच झाल्याचे एका आयपीएस अधिका-याने सांगितले.