आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्माकर वळवी, िपचड यांची आदिवासी परिषदेकडे पाठ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत शनिवारी आदिवासींच्या विविध संघटनांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्राॅसिटी) बचाव परिषद आयोजित केली होती. परिषदेला येण्याबाबत राज्याचे माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी आिण आदिवासी आमदार वैभव पिचड यांनी शब्द दिला होता, मात्र, या दोघा आदिवासी नेत्यांनी परिषदेकडे ऐनवेळी पाठ िफरवल्याने निमंत्रितांविनाच कार्यकर्त्यांवर परिषद पार पाडण्याची नामुष्की ओढवली.
राज्यात सध्या अॅट्राॅसिटी कायद्यात बदलाची मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. त्याला अनुसूचित जाती आणि जमाती यांचा मोठा विरोध आहे. त्यासंदर्भात पालघर, ठाणे आिण रायगड िजल्ह्यातील आदिवासी संघटनांनी आज दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मेळावा ठेवला होता. त्याला राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे नेते पद्माकर वळवी (नंदुरबार) आिण अकोलेचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड (अहमदनगर) यांना खास िनमंत्रित करण्यात आले होते. मात्र, आज दोघा नेत्यांनी ऐनवेळी परिषदेकडे पाठ फिरवली. राष्ट्रीय जनआंदोलनाचे संजय म. गो. वनहक्क चळवळीतील उल्का महाजन, सफाई कामगारांचे नेते जगदीश खैरालिया, रेशनिंग क्षेत्रातील कार्यकर्ते सुरेश सावंत आदींनी अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे महत्त्व विशद केले.

देशात आदिवासींच्या १४६ जाती असून अत्याचार प्रतिबंधक कायद्यास हात लावाल, तर रस्त्यावर उतरू असा इशारा या वेळी देण्यात आला. श्रमिक मुक्ती संघटना, शोषित जनआंदोलन, कष्टकरी संघटना, सर्वहारा जनआंदोलन, शेतकरी, शेतमजूर पंचायत आदी संघटनांचे हजारो कार्यकर्ते या परिषदेस हजर होते.
बातम्या आणखी आहेत...