आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सविताने आत्‍महत्‍येपूवी लिहीले- तुमच्‍या नायनाटाची तयारी करून मी जात आहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दोन महिलांनी समलैंगिक संबंधांसाठी दबाव टाकला म्‍हणून मुंबईतील रहिवाशी असलेल्‍या सविता राणे या युवतीने ग्‍वाल्‍हेरमध्‍ये गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. 18 एप्रिलला सकाळी ही घटना उघडकीस आली. मात्र अजूनपर्यंत पोलिसांनी याप्रकरणी कुणालाही अटक केली नाही. मात्र सविताचा एक मेल समोर आला आहे. त्‍यामध्‍ये तिने ‘I hate you’ असे लिहून गंभीर आरोप केले आहेत. शुभाने पोलिसांना र्इमेल देऊन केली होती तक्रार....
- समलैंगिक बनण्‍याच्‍या दबावापोटी आत्‍महत्‍या करण्‍यापूर्वी सविता राणेने 17 एप्रिलला घर
मालकीन शुभा श्रीवास्तवला ईमेल केला होता. या ईमेलची प्रत समोर आली आहे.
- 17 एप्रिलला रात्री 10 वाजता मुरार स्‍टेशन पोलिसांकडे एक तक्रार आली होती. त्‍यामध्ये
शुभाचे काका मनमोहन यांनी तक्रार केली होती की, सविता राणेने आत्‍महत्‍या करून आमचा
नायनाट करण्‍याची धमकी दिली आहे.
- तक्रारीला इमेलची प्रिंटही जोडण्‍यात आली होती.
- त्‍यामध्‍ये सविताने शुभाच्‍या दबावामुळे आत्‍महत्‍या करत असल्‍याचे म्‍हटले होते.
पोलिसांनी घेतली नाही दखल....
- मुरार पोलिस ठाण्‍याने सविताचा ईमेल गांभीर्याने घेतला नाही.
- ईमेल आणि तक्रारीची त्‍यांनी दखल घेतली असती, तर सविताचे प्राण वाचले असते.
- पोलिसांनी शुभाच्‍या कुटुंबियांची चौकशी केली. मात्र प्रकरणाच्‍या तपासात दिरंगाई होताना
दिसत आहे. दरम्‍यान शुभा आणि तिची वहिणी सीमा ग्‍वाल्‍हेरमधून फरार झाल्‍या आहेत.
कुटुंबियांचे म्‍हणने आहे की, त्‍या उज्‍जेनला गेल्‍या आहेत.
काय आहे प्रकरण....
- सविता राणे ग्वाल्‍हेरच्‍या प्रतिष्ठित पब्लिक स्कूलमध्‍ये अकाउंट मॅनेजर होत्‍या.
- मुरारच्‍या त्यागी नगरात ती भाड्याच्‍या घरात राहत होत्‍या.
- मुळची मुंबईची रहिवाशी असलेल्‍या सविताने दोन दिवस आधी तिच्‍या मित्रांना Whatsapps
वर एक नोट पाठवली होती.
- या नोटमध्‍ये तिने आपण आत्‍महत्‍या करणार असल्‍याचा उल्‍लेख केला होता.
- सविताने तिच्‍या घरमालकीन असलेल्‍या शुभा श्रीवास्तव आणि सीमा श्रीवास्तव यांनी
समलैंगिक संबंधांसाठी दबाव टाकल्‍याचा आरोप केला होता.
- सविताने तक्रार केली नाही म्‍हणून कारवाई केली नसल्‍याचे पोलिसांचे म्‍हणने आहे.
पुढील स्‍लाइड्समध्‍ये वाचा, सविताने र्इमेलमध्‍ये काय लिहीले..,
पाहा, सविताने ज्‍यांच्‍यावर आरोप लावले त्‍यांचे फोटो..,