आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’सोबत वाईटाला नाही म्हणण्याचे धाडस दाखवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - समाजात दिसून येणा-या वाईट गोष्टींचा सामना करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढे येण्याची गरज आहे. प्रत्येक बदलासाठी सरकार किंवा एखादी व्यक्ती, संस्थेची वाट पाहता येणार नाही. प्रत्येक व्यक्तीला पुढे होऊन दररोजच्या आयुष्यात पुढे येणा-या अनुचित घटनांच्या विरोधात आवाज उठवावा लागेल.


त्याचीच प्रेरणा देण्यासाठी ‘दैनिक भास्कर’या देशातील सर्वात मोठ्या वृत्तपत्र समूहाने ‘जिद्द बाळगा, जग बदला’ हे आपले नवे ब्रँड कॅम्पेनिंग सुरू केले आहे. या मोहिमेला यंदा ‘नाही’ म्हणण्याच्या सामर्थ्याची जोड देण्यात आली आहे. यात आपल्याला अशा गोष्टींना नकार द्यावा लागेल, ज्या तुमच्या तत्त्वांविरुद्ध आहेत. ही मोहीम समूहातर्फे याआधी राबवण्यात आलेल्या ‘जिद्द बाळगा’ या मोहिमेचा पुढील भाग आहे.


‘जिद्द’ शब्दाप्रमाणे या वेळी नकारात्मक भाव असलेल्या ‘नाही’ या शब्दाची निवड करण्यात आली आहे. यात ‘नको’ म्हणण्यामागील सकारात्मक सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. व्यक्तिगत पातळीवर ‘नाही’ची निवड खूपच सोपी आहे. परंतु सामुहिक स्वरूपात तोच नकार संपूर्ण समाजावर परिणाम करणारा ठरू शकतो. हेही सांगण्यात आले आहे की बदलात तो नकार कसा प्रेरकमार्ग ठरू शकतो. जेव्हा ‘नाही’चा प्रयोग योग्य वेळी केला जाईल तेव्हा तो सर्वात शक्तिशाली शब्द व कृती ठरतो. तो आपल्याला समाजाप्रति आणखी जबाबदार व्यक्ती बनवतो. या वेळीही तुमच्याकडे या निवडीचा अधिकार आहे की,आपल्याला यात प्रेक्षक व्हायचे आहे की भागीदार.
‘दिव्य मराठी’चे आवाहन आहे की, प्रत्येक व्यक्तीने सत्याला सामोरे जात आपली जबाबदारी उचलावी. जेव्हा तुमच्यासमोर तुमच्या मुल्यांशी तडजोड करण्याची परिस्थिती निर्माण होईल व ती बाब सत्याच्या पातळीवर उतरत नाही, असे वाटत असेल तर अशा वेळी तुम्ही ‘नाही’ म्हणायला शिका. हा ‘नाही’च तुमची प्रामाणिकपणे जीवन जगण्याची गुरुकिल्ली ठरेल.


समुहाचे ‘जिद्द बाळगा जग बदला’ अभियाने 2008 मध्ये सुरू झाले होते. महेंद्रसिंह धोनी त्याचे ब्रांड अ‍ॅम्बेसेडर होते. समुहाने 2011 -12 मध्येही प्रिंट माध्यमांमध्‍ये ‘जिद्द’ला व्यक्तिगत पातळीवर प्रोत्साहन देण्यासाठी अभियान सुरू केले. या वेळी ‘नाही’चे अभियान प्रिंट, रेडिओ व टीव्ही या तिन्ही माध्यमांमधून चालवण्यात येणार आहे. यासंदर्भातील फिल्मची निर्मिती देन्तसू कम्युनिकेशनने केली आहे.