आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • SC Refuses To Hear Plea Against Bombay HC Order On Bhujbal Gains

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्ता जाताच राजकीय कोंडी! राष्ट्रवादीकडूनही भुजबळांची पाठराखण न होण्याची चिन्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छगन भुजबळांच्या विरुद्ध विशेष चौकशी पथकाद्वारे चौकशी करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने भुजबळांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी पक्ष सत्तेत नसल्याने आणि अजित पवार यांना वाचवणे यालाच पक्षाचे प्राधान्य असल्याने भुजबळांना पक्षाकडूनही कितपत मदत होईल, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

भुजबळांचे भाजप आणि शिवसेनेशी उत्तम संबंध आहेत. सत्तेत असताना त्यांनी या दोन्ही पक्षातील नेत्यांना मदतही केली. त्यामुळे ‘एसआयटी’त कोणते अधिकारी नेमले जातात, त्यांना चौकशीचे स्वातंत्र्य किती मिळते, त्यांच्या अहवालावर प्रामाणिकपणे कारवाई होणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथग्रहण सोहळ्याच्या वेळेस मोदी यांनी दाखवलेल्या खास जवळीकीची प्रसिद्धीही भुजबळांनी करून घेतली होती. त्यामुळे भुजबळांसारख्या ओबीसी नेत्याबद्दल भाजप मवाळ राहू शकते, अशी चर्चाही आहे.
पुढे वाचा, बचाव अजित पवारांचाच?