आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी आणि आठवीत : शिक्षणमंत्री विनोद तावडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदी विचारात घेऊन पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी ऐवजी इयत्ता पाचवी आणि माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा सातवीऐवजी आठवीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी घेतला.

आरटीईत शिक्षण पद्धतीचे ३ विभाग केले आहेत. प्राथमिकमध्ये १ ली ते ५वी, उच्च प्राथमिकमध्ये ६वी ते ८ वी तसेच माध्यमिकमध्ये ९वी, दहावीचा समावेश केला. यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा ५वी, ८वीत होणे अपेक्षित आहे. मात्र यंदा ही परीक्षा घेणे शक्य नाही. कारण ४थी, ७ वी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ते आता ५वी व ८ वीत गेले आहेत. त्यांना पुन्हा पुढील वर्षी परीक्षा द्यावी लागेल. त्यामुळे २०१६-१७ मध्ये या नव्या पद्धतीनुसार शिष्यवृत्ती परीक्षा घेणे योग्य होईल असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

यापुढे ही योजना उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना या नावाने ओळखली जाणार आहे. परीक्षा पध्दती आणि अभ्यासक्रमात बदल काय असावेत याचा अभ्यास करण्यासाठी एक शिक्षण समिती नेमण्यात येणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...