आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जड झाले अाेझे : विद्यार्थ्यांच्या हाती पुन्हा पाटी अन‌् तिमाहीत एकच पुस्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दप्तराच्या अाेझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांची सोडवणूक करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अंतिम अहवाल िशक्षण िवभागाकडे सुपूर्द केला अाहे. त्यात एकूण ४४ िशफारशी करण्यात आल्या आहेत. िवद्यार्थ्यांनी वह्याऐवजी पाटी वापरावी अाणि तीन महिन्याच्या अभ्यासक्रमासाठी एकच पुस्तक बनवावे अशा िशफारशी या समितीने सरकारकडे केल्या अहेत.
राज्याचे शालेय िशक्षणमंत्री िवनोद तावडे यांनी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील काही शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या हाेत्या. त्यानंतर प्राथमिकचे िशक्षण संचालक यांच्या अध्यक्षतेखाली दप्तरांचे ओझे कमी करण्याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अंतिम अहवाल िशक्षण िवभागास नुकताच सादर केला अाहे. जून २०१६ मध्ये राज्यातील िवद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका करण्याचे िशक्षण िवभागाचे नियोजन आहे. त्यामुळे समितीच्या या अहवालावर सरकार काय िनर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

समितीचे िनष्कर्ष
{दहा वर्षांखालील ५८ टक्के िवद्यार्थ्यांना स्नायूदुखीचा त्रास आहे.
{ १२ वर्षांखालील ७५ टक्के िवद्यार्थ्यांना ओझ्यामुळे आजार जडले आहेत.
{ दप्तराच्या अाेझ्याने वाकून चालावे लागते, त्यामुळे विद्यार्थ्यांना मान पाठदुखीचा त्रास होतो.
{ िवद्यार्थ्यांची फुप्फुसाची तीव्रता कमी झालेली आढळली.
{ओझ्यामुळे िवद्यार्थ्यांचे सांधे आखडले जातात.
{ एक िवद्यार्थी-एक पुस्तक असे धोरण राबवावे. सर्व भाषा िवषय, गणित- भूमिती- विज्ञान अाणि समाजशास्त्र- इतर िवषय अशी त्रैमासिक पुस्तके.
{ समृद्ध पुस्तक धोरणानुसार तीन महिन्यांसाठी एकच पुस्तक तयार करण्यात यावे.
{ प्रत्येक वर्गपाठाला -गृहपाठाला स्वतंत्र वही करता अनेक िवषयांना एकच छोटी वही असावी.
{ एेंशी पानांपेक्षा मोठ्या तसेच जाड कव्हरच्या वह्यांवर बंदी घालण्यात यावी.
{ वह्याऐवजी पाटीचा वापर करावा. तसेच डेस्कवर काळा रंग देऊन त्यावर लेखनाचा सराव घ्यावा.
{ दररोज फक्त तीन िवषय वेळापत्रकात ठेवावेत. त्यामुळे कमी वह्या-पुस्तके न्यावी लागतील.
{ वर्षभरासाठी २०० पानी एकच वही करता प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र १०० पानी वही ठेवावी.
{ केवळ भाषा िवषयाचीच पुस्तके शाळेत आणावीत, इतर पुस्तके घरीच ठेवावीत.
{ सीबीएससी, आयसीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांनी खासगी प्रकाशनाचे कोणतेही एकच पुस्तक निवडावे.
{ िपण्याचे शुद्ध पाणी विद्यार्थ्यांना शाळेत उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे दप्तरासाेबतच्या िपण्याच्या पाण्याच्या बाटलीचे ओझे कमी होईल.
{ प्रत्येक शाळेत ग्रंथालयासारखे ‘दप्तरालय’ सुरू करावे. यात शैक्षणिक साहित्य िवद्यार्थीनिहाय उपलब्ध करून द्यावे.

पालक प्रशिक्षण
शाळेनेदिलेल्या वेळापत्रकानुसार आपल्या पाल्याची बॅग कशी भरावी याचे प्रशिक्षण सर्व शाळांनी पालकांना द्यावे, अशी सूचनाही या समितीने आपल्या ४४ िशफारशींमध्ये केलेली आहे.
बातम्या आणखी आहेत...