आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दप्तराचे ओझे: शाळा हेडमास्तरांवर काय कारवाई होईल? मुंबई हायकोर्टाचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाळकरी मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याच्या शिफारशींची अंमलबजावणी न करणारे मुख्याध्यापक किंवा शाळांच्या विश्वस्तांवर काय कारवाई करणार, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला केली.

न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि आणि न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी संभाव्य कारवाईबाबतचा अहवाल १७ डिसेंबरपर्यंत देण्याचे निर्देश सरकारला दिले. तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत शाळांना एका परिपत्रकाद्वारे निर्देश दिले असून ओझे कमी करण्याची जबाबदारी शाळांचे मुख्याध्यापक आणि विश्वस्तांवर टाकण्यात आल्याची माहिती मागच्या आठवड्यात राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली होती. मुलांच्या पाठीवर दप्तराच्या वाढत्या ओझ्याबाबत सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
समस्या - शालेय मुलांच्या वयाच्या तुलनेत २० ते ३० टक्के जास्त दप्तराचे ओझे लादले जाते. त्यामुळे १० वर्षे वयाखालील ६० टक्के मुलांत पाठदुखी, तणाव व अन्य समस्या उद््भवत आहेत.

शिफारस - प्रत्येक विषयासाठी तीन महिन्यांसाठी एकच वही, जाड कव्हर नसलेली कमी वजनाची पुस्तके वापरावीत, ई- क्लास रूम, दृकश्राव्य व अन्य आधुनिक अध्यापन तंत्र वापरावे.