आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांची फी आता दर्जानुसार ठरणार; नॅकच्या धर्तीवर होणार मूल्यांकन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नॅकच्या धर्तीवर शाळांसाठी मूल्यांकन पद्धत सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने तत्त्वत: मान्यता दिली. यामुळे शाळांची अ, ब, क, ड अशी विभागणी करून दर्जा ठरवता येईल. दर्जानुसार फीही ठरवली जाईल.


शालेय शिक्षण विभागाने हा प्रस्ताव दिला होता. शाळांतील शैक्षणिक साहित्य, पायाभूत सुविधा, शिक्षणाचा दर्जा आदी सर्व बाबींची तपासणी या माध्यमातून केली जाईल. यासाठी शिक्षण खात्यांतर्गत स्वतंत्र प्राधिकरण नेमले जाईल. त्यामुळे पालकांना शाळेचा दर्जा कळू शकेल. भरमसाट फी आकारणा-या शाळांना चाप बसण्यासोबतच सुधारणा न होणा-या शाळा बंद करण्याचा विचारही होऊ शकतो.


अ‍ॅटेस्टेडची गरज नाही
शाळा व कॉलेजांतील प्रवेश प्रक्रियेमध्ये गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रतीची आता गरज नाही. विद्यार्थ्यांनी स्वत: साक्षांकित करून गुणपत्रिका सादर करावी. प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी मूळ प्रतीशी तुलना करून संबंधित अधिकारी ती प्रत ग्राह्य धरतील, अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे.