आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Firist Day Chief Minister, Deputy Chief Minister, Ministers Welcoming Children

शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्‍यमंत्री, उपमुख्‍यमंत्री, मंत्री करणार मुलांचे स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुलांना शाळेविषयी आपुलकी वाटावी म्हणून शिक्षण विभागाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री, आमदार, महापौर, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधी मुलांचे खास स्वागत करणार आहेत. शाळा हे आनंददायी ठिकाण असून मुलांना भीती वाटायला नको म्हणून हा प्रयत्न केला जाणार असल्याचे शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी गुरुवारी सांगितले.
राज्यातील सर्व शाळा 17 जूनपासून व विदर्भातील शाळा 26 जूनपासून सुरू होणार आहेत. त्या वेळी खासगी व सरकारी अशा दोन्ही शाळांमध्ये मुलांसाठी विशेष कार्यक्रम ठेवण्यात येणार असून त्या भागातील लोकप्रतिनिधी मुलांचे स्वागत करतील, असे दर्डा म्हणाले.


शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाºयांशी बुधवारी झालेल्या बैठकीतून ही संकल्पना पुढे आली. पहिलीत येणारी अनेक मुले थोडी घाबरलेली असतात किंवा त्यांना पालकांपासून दूर राहण्याचे दु:ख असते. अशावेळी त्यांना धीर देऊन चांगले वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण 1.4 टक्के असून ते कमी करण्यासाठी विविध उपाय राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून मुलांनी पुढेही शिक्षण सुरू ठेवावे, या अपेक्षेने त्यांचा स्वागत समारंभ केला जाईल, असे दर्डा यांनी सांगितले.