आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेचा आंबट शौकीन शिपाई जेरबंद; गर्ल्स टॉयलेटमध्ये कॅमेरा लावून बनवायचा अश्लील व्हिडिओ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विक्रोळी पोलिसांनी एका शाळेच्या आंबड शौकीन शिपाईला अटक केली आहे. शाळेच्या गर्ल्स टॉयलेटमध्ये कॅमेरा बसवून तो विद्यार्थिंनीच्या अश्लील क्लिप बनवत होता. विजय विश्वनाथ शिवतारे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी मागील चार वर्षांपासून हे कृत्य करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

डीसीपी सचिन पाटील यांनी सांगितले की, आरोपीला अटक केली असून त्याच्या ‍विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. काल (गुरुवार) त्याला कोर्टात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

शाळेच्या टॉयलेटमध्ये मोबाइल कॅमेर्‍याने रेकॉर्डिंग होत असल्याचा एका विद्यार्थिनीला संशय आला होता. तिने याबाबत वर्गशिक्षिकेकडे तक्रार केली. त्यानंतर या धक्कादायक प्रकाराचा खुलासा झाला. प्राचार्यांनी टॉयलेटमधील मोबाइल काढून चौकशी केली असता तो आरोपी शिपाई विजय शिवतरे याचा असल्याचे समजले. घटनेचा खुलासा होताच आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले. आरोपी एखाद्या पोर्न साइटसाठी तर काम करत नाही ना, याचा पोलिस शोध घेत आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा... घटनेशी संबंधित फोटो...