आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शिपायाला होती अजब आवड; मुलींच्या टॉयलेटमध्ये करायचा असे काही ज्यामुळे तुम्ही व्हाल आश्चर्यचकित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपीला कोर्टात नेताना पोलिस कर्मचारी. - Divya Marathi
आरोपीला कोर्टात नेताना पोलिस कर्मचारी.
मुंबई- विक्रोळी पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फिर्यादीवरून एका शिपायावर गुन्हा दाखल झाला आहे. या शिपायाला पोलिसांनी अटक केली आहे. तो मागील 4 वर्षापासून एका शाळेत काम करत होता. त्या शाळेच्या टॉयलेटमध्ये त्याने कॅमेरा लावला होता. या कॅमेराद्वारे तो व्हिडिओ क्लिप बनवायचा. चौकशी दरम्यान आपण केवळ आवड म्हणुन हे करत होतो, असे त्याने सांगितले. 
 
असे उघड झाले शिपायाचे कृत्य
- झोन 7 चे डीसीपी सचिन पाटील यांनी सांगितले की आरोपी शिपायाचे नाव विजय विश्वनाथ शिवतार असे आहे.
- पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरोधात आयपीसीच्या कलम 354 (क) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
- गुरूवारी संध्याकाळी आरोपीला कोर्टासमोर हजर करण्यात आले कोर्टाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. या प्रकरणाचा तपास विक्रोळी पोलिस करत आहेत. 
- एका मुलीला टॉयलेटमध्ये मोबाईलद्वारे शुटिंग होत असल्याचा संशय आला. त्यानंतर तिने ही बाब शिक्षिकांना सांगितली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
- शाळेच्या मुख्याध्यापिकांनी हा मोबाईल विजय शिवतारे असल्याचे ओळखले.
- घटना उघडकीस आल्यावर शिवतारे फरार झाल होता. पोलिसांनी सापळा रचुन त्याला अटक केली.
 
आरोपी म्हणाला आवडीसाठी करत होतो हा प्रकार
- केवळ आवड म्हणुन आपण हे करत होतो, असे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे.
- पोलिस या घटनेचा आरोपी कोणत्या पॉर्न साइटसाठी तर काम करत नव्हता ना, या बाजूनेही तपास करत आहेत.
- या प्रकरणी अनेक महिलांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...