आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लावणी कलावंतांच्या मुलांना शाळेत प्रवेश राखीव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमातीत मोडणार्‍या तमाशा कलावंत तसेच लावणी कलावंत यांच्या मुलांना आश्रमशाळेत प्रवेशासाठी राखीव कोटा ठेवण्याचा निर्णय सरकारने गुरुवारी घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश सरकारने जारी केला असून यामुळे तमाशा कलावंतांच्या हजारो मुलांना दिलासा मिळणार आहे.

राज्यातील लावणी कलावंत आणि तमाशा कलावंतांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत. शिक्षणाचा अधिकार कायद्यानूसार त्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील मुलामुलींसाठी असलेल्या आश्रमशाळांमध्ये प्रवेश राखीव ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानूसार राज्यातील प्राथमिक निवासी विद्यार्थ्यांपैकी 5 जागा आणि माध्यमिक आश्रमशाळेसाठी मंजूर निवासी विद्यार्थ्यांपैकी 5 जागा अशा एकूण 10 जागा राखीव मुलामुलींसाठी राखीव प्रवेश कोटा ठेवण्यात येणार आहे. जर तमाशा आणि लावणी कलावंतांसाठी राखीव ठेवलेल्या प्रवर्गात जर विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागांवर प्रचलित पद्धतीने विजाभजच्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश देण्यात येणार आहे.