आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांची वेळ ६ वरून ८ तास करण्याचा प्रस्ताव, पालक, शिक्षण संघटनांचा विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आठवीपर्यंतच्या वर्गांची वेळ ६ ऐवजी ८ तास करण्याच्या शिफारशीला पालक तसेच शिक्षण संघटना विरोध करत आहेत. असा निर्णय झाला तर तो मुलांच्या हिताचा नसेल, असे त्यांचे म्हणणे आहे. मुख्याध्यापक संघटनेने त्याला विरोध करण्याची घोषणा केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणाचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्राने त्यावर लोकांची मते मागवली आहेत. आपला अहवाल ऑनलाइन जाहीर करा, असे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. राज्याच्या अहवालावर २३ नोव्हेंबरपर्यंत लोकांकडून हरकती, सल्ला मागवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची क्षमता वाढेल, असा शिक्षण विभागाचा दावा आहे.