आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scorpene Submarine Defence, Indian Navy Parrikar Mumbai

पहिल्या स्वदेशी स्कॉर्पेन पाणबुडीचे संरक्षण मंत्री पर्रीकरांच्या हस्ते जलावतरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारताने बनविलेल्या पहिल्या स्वदेशी स्कॉर्पिन पाणबुडीचे साेमवारी मुंबईजवळील माझगाव डॉकयार्ड येथे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले. यावेळी नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर. के. धोवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

स्कॉर्पिन पाणबुडी हा भारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट 75’ या पाणबुडी कार्यक्रमाचा एक भाग आहे. फ्रान्सच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये अशा सहा पाणबुड्या पुढील काही वर्षांमध्ये नौदलात दाखल होणार अाहेत.

सध्या भारतीय नौदलाकडे 14 डिझेल-इलेक्ट्रॉनिक अशा पारंपरिक पाणबुड्या आहेत. त्यामध्ये दहा रशियन किलो क्लास आणि चार जर्मन एचडीडब्ल्यू पाणबुड्यांचा समावेश आहे.