आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sea Plane Start, Juhu To Lonavala, News In Marathi

PHOTOS: सी-प्लेनने 2999 रुपयांत जुहूवरून लाेणावळा गाठा अवघ्या 25 मिनिटांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेली दाेन वर्षे सुरू हाेणार म्हणून पाण्यावरच घिरट्या घालत असलेल्या सागरी विमानाने अखेर साेमवारी दुपारी बारा वाजता जुहू विमानतळावरून लाेणावळ्याच्या पवना धरणाच्या दिशेने अाकाशभरारी घेतली. राज्यातील पर्यटनाला अाता हवाई बळकटी मिळण्यास मदत हाेणार अाहे.

मेरीटाइम एनर्जी हेिल एअर सर्व्हिसेस प्रा.लि. (मेहर) आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या सहकार्यातून सुरू झालेल्या या पहिल्या व्यावसाियक सागरी विमानसेवेचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अाैपचारिक उद्‌‌‌‌घाटन करण्यात अाले. या सागरी विमानसेवेला ग्राहकांकडून लक्षणीय प्रतिसाद मिळत अाहे.विशेष म्हणजे दैनिक आणि साप्ताहिक विमान सेवांचे १५ सप्टेंबरपर्यंतचे पूर्णत: अारक्षण झाले असल्याचे कंपनीचे सहसंस्थापक आणि संचालक सिद्धार्थ वर्मा यांनी सांगितले.

सागरी विमानसेवेचा अन्य राज्यात विस्तार करण्याचा मानस व्यक्त करुन वर्मा पुढे म्हणाले, धूम, मुळे, गंगापूर धरण या ठिकाणांना सेवा देण्याचा विचार अाहे. त्यामध्ये नागरी हवाई महासंचालनालयाने मुळा धरणासाठीच्या सागरी विमानसेवेला अगाेदरच परवानगी दिली असून अन्य दाेन ठिकाणांना लवकरच परवानगी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सागरी विमानसेवेसाठी मेहर कंपनीने विमाने ताब्यात घेण्यासाठी अातापर्यंत १५ काेटी रुपयांची गुंतवणूक केली असून डिसेंबरपर्यंतअाणखी पाच विमाने ताफ्यात येणार अाहेत. सध्या ‘सेस्ना २०६’ जातीचे (भाडेतत्त्वावरील) चार अासनी आणि ‘सेस्ना २०८ ए’ हे नऊ अासनी विमान कंपनीच्या मालकीचे अाहे.

पुढील महिन्यात अाणखी एक सेस्ना २०८ ए विमान ताब्यात येणार असल्याची माहिती वर्मा यांनी दिली.गिरगाव चाैपाटीवरून सागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी मुंबई पाेर्ट ट्रस्टनेदेखील अलीकडेच परवानगी दिली अाहे.

पहिल्या प्रवासाचा अनोखा अानंद
जुहू - लाेणावळा सागरी विमान प्रवासाचा पहिला अानंद लुटणाऱ्या नऊ प्रवाशांमध्ये लंडनमधील एका कुटुंबाचा समावेश हाेता, तर दुसऱ्या एका कुटुंबाने लाेणावळ्यापर्यंतचा एकमार्गी प्रवास केला. विशेष शर्मा या प्रवाशाने परतीचा प्रवास केला.

पुढे पाहा, पवना डॅमवर उतरलेल्या सी-प्लेनची छायाचित्रे....