आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Search Bogus Worker Union And Leader Says CM Fadanvis

बाेगस कामगार नेत्यांच्या तातडीने मुसक्या अावळा, मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातीलउद्याेगपतींना ब्लॅकमेल करणाऱ्या बाेगस कामगार नेत्यांच्या मुसक्या अावळण्याचे अादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाेलिस अधिकाऱ्यांना दिले अाहेत. उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी या माहितीला दुजाेरा दिला. ‘काही दिवसांपूर्वीच पाेलिस उद्याेग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन हे अादेश देण्यात अाले,’ असे ते म्हणाले.
‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून अापल्या देशाची जगभरात प्रतिमा उज्ज्वल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी झटत अाहेत. जगभरातील उद्याेग क्षेत्रातील १८९ देशांमध्ये भारताचा क्रमांक १३२ वा लागताे. हे चित्र बदलून पहिल्या ५० देशांच्या यादीत भारताचे नाव अाणण्यासाठी पंतप्रधान माेदींचे प्रयत्न सुरू अाहेत, असे देसाई म्हणाले. अापल्या देशात उद्याेजकांना सुरक्षित वातावरण मिळत नाही. काही कथित कामगार नेत्यांकडून अापल्याला ठरावीक लाेकांनाच कामाचे कंत्राट देण्यासाठी ब्लॅकमेल केले जात असल्याच्या तक्रारी राज्यातील काही उद्याेजकांनी सरकारकडे केल्या अाहेत. यापैकी सर्वाधिक तक्रारी पुणे विभागातून अाल्या अाहेत. राज्यातील अाैद्याेगिकीकरण वाढावे, राेजगार वाढावा यासाठी सरकार एकीकडे उद्याेजकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे काही लाेक मात्र त्यांना धमक्या देत असल्याचे समाेर अाले अाहे. त्याची गांभीर्याने दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याचे उद्याेगमंत्री देसाई म्हणाले.

माथाडी असल्याचा दावा
उद्याेजकांनाब्लॅकमेल करणारे कथित कामगार नेते अापण माथाडी कामगार संघटनेचे नेते असल्याचे व्हिजिटिंग कार्ड सर्रास वापरत अाहेत. याबाबत अाम्ही ‘माथाडी’च्या नेत्यांकडे चाैकशी केली असता या कामगार नेत्यांचा अापल्या संघटनांचा काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात अाले. तसेच अशा बाेगस नेत्यांवर कारवाई करण्याची मागणीही संघटनेकडून करण्यात अाली, असेही उद्याेगमंत्र्यांनी स्पष्ट केले.

उद्याेजकाचे अपहरण
एकासर्वेक्षणानुसार, देशात उद्याेजकांसाठी सुरक्षित वातावरण नसल्याचे समाेर अाले अाहे. काही दिवसांपूर्वीच काेल्हापुरातील एका उद्याेजकाचे कथित कामगार नेत्याने अपहरण केले हाेते. उद्याेगमंत्री सुभाष देसाई काेल्हापुरात गेले तेव्हा तेथील उद्याेजकांनी अशा असुरक्षित परिस्थितीकडे त्यांचे लक्ष वेधले हाेते.