आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथित भ्रष्ट भाजप मंत्र्यांवर ‘ती’ पुस्तिका आमची नाहीच; शिवसेनेचे घूमजाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ममतादीदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईत भेट झाली. - Divya Marathi
ममतादीदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईत भेट झाली.
मुंबई- कथित घोटाळेबाज भाजप मंत्र्यांची पोलखोल करणारी पुस्तिका शिवसेनेच्या बैठकीत दाखवून नंतर त्याचे जिल्हास्तरावर वाटप हाेणार, असे वृत्त प्रसिद्ध होताच शिवसेनेने घूमजाव केले. ही पुस्तिका मुळात शिवसेनेने काढली नसून बैठकीत कुणीतरी ती आणून दिल्याचे शिवसेना नेत्यांनी खासगीत सांगितले. दरम्यान, पुस्तिकेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली. तसेच या पुस्तिकेला प्रत्युत्तर देण्याची तयारी भाजपने सुरू केल्यानेच शिवसेनेने घूमजाव केल्याचे सांगितले जात आहे.

बुधवारी सेना भवनात उद्धव ठाकरेंच्या बैठकीत निवडणुकांच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. बैठकीतच ‘घोटाळेबाज भाजप’ ही पुस्तिकाही देण्यात आली. आगामी काळात राज्यभर ही पुस्तिका वाटण्याचेही ठरवण्यात आले. मात्र ही बातमी बाहेर येताच भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. 

सोशल मीडियावर प्रसिद्धीची योजना: राज्यभर ही पुस्तिका वाटायची तर खूप पुस्तिका छापाव्या लागतील. त्यापेक्षा सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जाहीरपणे लोकांसमोर आणण्याचीही योजना असल्याचे शिवसेना सूत्रांनी सांगितले.
 
म्हणे पुस्तिका अचानक समोर आली 
पुस्तिकेवर कोणाचेही नाव नसल्याने ती कोणी छापली हे ठाऊक नाही, असे एका शिवसेनेच्या नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. बैठक सुरू असताना अचानक पुस्तिका समोर आली. या पुस्तिकेबाबत आम्हाला कसलीही माहिती नव्हती असेही या नेत्याने सांगितले. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, ममतादीदी-उद्धव ठाकरे भेट ....
बातम्या आणखी आहेत...