आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seat Sharing Formula May Done Today At Delhi, Mahayuti Meeting Also At Mumbai

जागावाटपाचा तिढा: आघाडीची दिल्लीत खलबते तर महायुतीची मुंबईत बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शरद पवार, ए.के. अॅंटोनी व गुलाबनबी आझाद यांचे संग्रहित छायाचित्र)
मुंबई- विधानसभा निवडणुक तोंडावर येऊन ठेपली आहे. पुढील आठवड्यात केव्हाही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची व विरोधी पक्षांच्या महायुतीच्या जागावाटपाला आजपासून गती मिळाली आहे.
नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आघाडीची खलबते आज सायंकाळी होणार आहेत आहेत, तर इथे मुंबईत महायुतीच्या सर्व सहा पक्षांच्या प्रमुखांचीही जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. आघाडी व महायुतीच्या आजच्या बैठकीतून कोणते पक्ष किती जागा लढविणार याचा फॉर्म्यूला ठरण्याची शक्यता आहे. तसेच पुढील तीन-चार दिवसात कोणत्या जागा लढवायच्या व कोणत्या सोडायच्या याचा निर्णय हे पक्ष घेणार आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज सायंकाळी सहा वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी होत आहे. यात काँग्रेसकडून ए. के. अॅंटोनी, अहमद पटेल तर, राष्ट्रवादीकडून शरद पवार, प्रफुल्ल पटेल या नेत्यांत चर्चा होणार आहे. राज्यातील काँग्रेस नेते आजच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत. कारण आजच्या बैठकीत कोणी किती जागा लढवायच्या याची चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीने 144 जागांची मागणी लावून धरली आहे. मात्र, काँग्रेसने ही मागणी फेटाळून लावली आहे. अर्थात राष्ट्रवादीला 130 पर्यंत जागा सोडाव्यात असे वाटत आहे. तसेच त्यांची ही मागणी मान्य होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने त्यांना अधिक 10 जागा देण्याची तयारी दर्शिवल्याचे बोलले जाते.
पुढे वाचा, महायुतीच्या बैठकीबाबत तसेच भाजप व शिवसेना किती जागा लढविणार...