आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

24 कंपन्यांच्या ट्रेडिंग डाटाची तपासणी सुरु, WhatsApp वर लीक झाल्या होत्या डिटेल्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेबी व्हॉट्सअॅपवर 24 कंपन्यांचे डिटेल्स लिक झाल्याबद्दल गंभीर आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
सेबी व्हॉट्सअॅपवर 24 कंपन्यांचे डिटेल्स लिक झाल्याबद्दल गंभीर आहे. (संग्रहित फोटो)

मुंबई- सेबीने आणि स्टॉक एक्सचेंजने 24 कंपन्यांच्या स्टॉकच्या ट्रेड डिटेलची तपासणी सुरु केली आहे. स्टॉक एक्सचेंजपर्यंत पोहचण्यापूर्वीच या कंपन्यांचे आर्थिक निकाल सविस्तरपणे व्हॉट्सअॅपवर मिळाले होते. सेवीने स्टॉक एक्सचेंजला त्या लोकांचा ट्रेडिंग डाटाही तपासण्यास सांगितले आहे ज्यांनी रिझल्ट लिक होत असताना स्टॉक ट्रेडिंग केले होते. 

 

स्टॉक एक्सचेंज देत आहे कंपन्यांची माहिती 
- सेबीच्या नियमांनुसार, लिस्टेड कंपन्यांबाबत सगळी माहिती स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातूनच सार्वजनिक करण्यात आली पाहिजे.  कंपन्यांच्या ट्रेडिंगशी निगडित माहितीमुळे शेअरच्या किमतीवर प्रभाव पडतो. मागील काही दिवसात इनसाइडर ट्रेडिंगच्या माध्यमातून किमतींना प्रभावित करण्याची काही प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे सेबीने इनसाइडर ट्रेडिंगवर सक्ती केली. 

 

12 महिन्यांपासून होत आहे डाटाची तपासणी
- सेबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या कंपन्यांमध्ये ब्लूचिप कंपन्यांचाही समावेश आहे. सेबी या सर्व कंपन्यांच्या मागील 12 महिन्यांच्या ट्रेड डाटाची तपासणी करत आहे. इनसाइडर ट्रेडिगद्वारे नियमांचा भंग तर होत नाही ना याची सेबी तपासणी करत आहे.

 

या कंपन्यांची माहिती झाली होती लिक
डॉ. रेड्डीज, टाटा स्टील, एचडीएफसी, एक्सिस आणि महिंद्रा हॉलिडेज या कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्टची माहिती व्हॉट्सअॅपच्या एका ग्रुपवर लिक झाली हाती. 

 

 

बातम्या आणखी आहेत...