आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील दुसरी सैनिकी शाळा चंद्रपूर जिल्ह्यात, 15 दिवसांत सामंजस्य करार : पर्रीकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा साताऱ्यात २३ जून १९६१ सुरू झाली होती. या शाळेतील विद्यार्थ्यांनी सेनादल, वायुदल, नौदल तसेच सनदी सेवेतील उच्चपदस्थ अधिकारपदे भूषवली आहेत. मात्र अाता कर्नाटक, हरियाणा व बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दुसर सैनिकी शाळा उभारली जात अाहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे ही शाळा उभारण्यात येणार अाहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर मंगळवारी मंत्रालयात आले होते. या वेळी अर्थमंत्री पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर दुसऱ्या सैनिकी शाळेचा प्रस्ताव मांडला. शाळेसंदर्भात विधानसभेत आधीच ठराव झाला असून बिहारमधील नालंदा येथील सैनिकी शाळेच्या धर्तीवर ही शाळा उभारण्यात येणार असून यासंबंधी १५ दिवसांत सामंजस्य करार करण्यात येणार आहे, असे पर्रीकर यांनी सांगितले. या शाळेसाठी जागा राज्य सरकारची असली तरी आराखडा, सुविधा, कर्मचारी अशी सर्व प्रकारची व्यवस्था ही केंद्र सरकारकडून केली जाते. विद्यार्थ्यांची निवडही केंद्र सरकारच्या निकषानुसार केली जाते. सन २०१८ पर्यंत ही शाळा उभारली जाणार असून त्यात विद्यार्थ्यांची संख्या ३०० ऐवजी ६०० असेल.

मुंबईत परमवीरचक्र विजेत्यांचे स्मारक
देशातील २३ परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांचे भव्य स्मारक मुंबईत उभारले जाणार असून यासाठी मरीन ड्राइव्हसह तीन जागांची पाहणी करण्यात आली आहे. हे स्मारक भव्य स्वरूपात बांधले जाणार असून देशासाठी बलिदान करणाऱ्यांच्या आठवणी या स्मारकातून जाग्या तर होतीलच, पण युवकांसाठी ते प्रेरणास्थानही ठरणार आहे. स्मारकासाठी सर्वतोपरी मदत केंद्राकडून दिली जाणार आहे. यात परमवीर चक्र पुरस्काराच्या मानकऱ्यांविषयीचा साहित्याचाही समावेश असेल.
बातम्या आणखी आहेत...