आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई कार टोईंग प्रकरण: बाळाचा जीव धोक्यात घालून चालू कारमध्ये बसली महिला!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तक्रार करणा-या महिलेला समजावून सांगताना मुंबई पोलिस (डावीकडे) तर उजवीकडे महिला त्यांच्याशी वाद घालताना.... - Divya Marathi
तक्रार करणा-या महिलेला समजावून सांगताना मुंबई पोलिस (डावीकडे) तर उजवीकडे महिला त्यांच्याशी वाद घालताना....
मुंबई- मुंबईतील कार टोईंग प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. शनिवारी व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर मुंबई पोलिसांच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता नवा व्हिडिओ समोर आला आहे. शनिवारी व्हायरल केलेला व्हिडिओ संबंधित महिलेच्या पतीने व्हायरल केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांची पुरती नाचक्की झाली. यामुळे एका पोलिसाला निलंबित करण्यात आले. मात्र, निलंबनाची कारवाई झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सत्य सांगणारा व्हिडिओ सादर केला आहे. यात कार टोईंग करताना संबंधित महिला कारमध्ये नव्हती. तसेच ती बाळाला दूधही पाजत नव्हती हे नव्या व्हिडिओतून समोर आले आहे. कार टोईंग करण्यासाठी संबंधित महिलेला समजावून सांगतानाही दिसत नाहीत. त्यावेळी महिला उलट बोलताना दिसत आहे तसेच तिचा पती व्हिडिओ काढण्यात दंग असल्याचे दिसून येत आहे. काय आहे दुस-या व्हिडिओत...
 
- पोलिसांनी सादर केलेल्या व्हिडिओत हे स्पष्टपणे दिसत आहे की, संबंधित महिलेचे बाळ तिच्या पतीच्या हातात आहे.
- संबंधित महिलेला कारमधून खाली उतरण्यास सांगत आहेत. मात्र, महिला ऐकत नसल्याचे व त्यांनाच अरेरावी करताना दिसत आहे.
- पोलिस कर्मचारी महिलेला सांगत आहे की, येथे आता बोलून काहीच उपयोग नाही, तुम्ही साहेबांशी बोला. व्हिडिओत महिला म्हणत आहे की, माझ्यापुढे दहा गाड्या असताना तुम्ही आमचीच गाडी का उचलत आहात.
- कारच्या बाहेरचा एक व्यक्तीला महिलेला म्हणत आहे की, कारमधून बाहेर येऊ नको. कार घेऊन गेले तरी ती उतरू नकोस.
 
महिला आयोग म्हणाले, संबंधित महिलेवर कारवाई करा-
 
- पोलिसांनी दुसरा व्हिडिओ सादर केल्यानंतर महिला आयोगाने महिलेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
- पोलिसांची चूक असेल तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कराच पण संबंधित महिलेने जर बेजबाबदार वर्तन केले असल्यास तिच्यावरही कारवाई करा.
- रेखा शर्मा पुढे म्हणाल्या की, मी हे दोन्ही व्हिडिओ पाहिल्यावर या निष्कर्षापर्यंत पोहचले होते की या पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले पाहिजेच. 
- पण, सकाळी मी वर्तमानपत्रांमध्ये वाचले की महिला चालत्या कारमध्ये बाळाला घेऊन जाऊन बसली होती.
-  तेव्हा मला त्या लहान बाळाविषयी चिंता वाटली, बाळासह आपल्याला काही इजा, अपघात होईल असे मनाला शिवले नाही का याचे आश्चर्य वाटते. 
- दोषी पोलिस कर्मचाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत मोकळे सोडले नाही पाहिजे, पण महिलेची चूक असेल तिच्यावरही कारवाई करा.
 
मुख्यमंत्री काय म्हणाले?
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही अतिशय वाईट घटना आहे. यात पोलिसांची असंवेदनशीलता दिसून येते. पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस विभागाला याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. यापुढे अशा घटना घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
 
महिला काय म्हणाली होती?
 
- पोलिसांनी मला कारमधून खाली उतरण्यास सांगितले नाही. मी त्यांना सांगितले की, मी बाळाला दूध पाजत आहे. पण त्यांनी माझे ऐकले नाही.
-  पीडित ज्योती माले म्हणाल्या की, तिच्या कारसमोर आणखी काही कार उभ्या होत्या. मात्र पोलिसांनी त्या उचलल्या नाहीत.
- या प्रकरणी वाहतूक पोलिस सहआयुक्त अमितेशकुमार यांनी चौकशीचे आदेश दिले. तसेच शशांक राणे नावाच्या एका पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे. 
 
काय आहे प्रकरण, काय दिसले पहिल्या व्हिडिओत?
 
- ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली होती. मालाड येथील एसव्ही रस्त्यावर एक महिला आपल्या 7 महिन्याच्या बाळासह कारमध्ये बसलेली होती.
- ती महिला आपल्या बाळाला दूध पाजत होती त्यावेळी वाहतूक पोलिस त्या ठिकाणी आले आणि कार क्रेनने उचलून आपल्या सोबत नेऊ लागले. पोलिसांच्या म्हणण्यानूसार कार चुकीच्या पध्दतीने पार्क केलेली होती.
- आजुबाजूचे लोक आणि ही महिला पोलिसांना आवाज देऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
- हा व्हिडिओ एका स्थानिक नागरिकाने आपल्या फोनवरुन काढला आहे. या व्हिडिओत स्थानिकांचा आवाज देखील येत आहे.
- एक व्यक्ती वारंवार वाहतूक पोलिसांना महिला कारमध्ये असल्याचे सांगत आहे. पण पोलिस त्याचे काहीही ऐकत नसल्याचे दिसत आहे.
- व्हिडिओत ही व्यक्ती म्हणत आहे की, यासाठी दंड भरण्यास तयार आहे, पण मुलाचा मृत्यू झाल्यास या जबाबदार कोण असणार? तो व्हिडिओत वारंवार शशांक राणे हे नाव घेत आहे.
- मात्र, आता पोलिसांनी सादर केलेल्या व्हिडिओनंतर सत्या समोर आले आहे. यात संबंधित पोलिसांसह महिलेनेही बेजबाबदार वर्तन केल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज आणि व्हिडिओज....
बातम्या आणखी आहेत...