आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Secreatly Memorial's Inaugaration ,shivsainik Angre

स्मारकाचे गुपचूप भूमिपूजन, शिवसैनिकांमध्ये संताप !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवाजी पार्क येथे बांधण्यात येणा-या स्मृती उद्यानाचे पक्षाच्या नेत्यांनी गुपचूपपणे भूमिपूजन केल्यामुळे शिवसैनिक प्रचंड नाराज झाले आहेत.
बुधवारी दुपारी शिवसेना नेते दिवाकर रावते, महापौर सुनील प्रभू आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्यासह निवडक नेत्यांनी स्मृती उद्यानाचे भूमिपूजन उरकले. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे वा ठाकरे कुटुंबीयातील कोणीही उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे या भूमिपूजन समारंभाला शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत सर्वप्रथम वक्तव्य देणारे संजय राऊत, मनोहर जोशी, सेनेचे गटनेते सुभाष देसाई, राज्यसभा सदस्य अनिल देसाईही गैरहजर होते.

श्रेय लाटण्याचा प्रयत्न
नेत्यांनी गुपचूपपणे भूमिपूजन उरकले गेल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अंधेरीतील शिवसेनेच्या पदाधिका -यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, भूमिपूजन असे अचानक आणि गुपचूप का उरकले गेले ते समजत नाही. शिवसेनाप्रमुख म्हणजे फक्त राज्याचे नव्हे तर देशातील आदरणीय व्यक्ती होते. त्यांच्यावर प्रेम करणारे लाखो शिवसैनिक देशभर पसरलेले आहेत. त्यांचे उचित स्मारक व्हावे असे सगळ्यांना वाटते; परंतु काही नेते आपणच कैवार घेतल्याचे दाखवत स्मारकाबाबत वक्तव्ये देत होते. स्मारक बांधण्याचे श्रेय आपल्याला मिळावे म्हणूनही काही नेते प्रयत्न करीत असल्याची टीकाही या पदाधिका-याने केली.

शिवसेनेचा उमेदवार का नाही?
केवळ भूमिपूजनाबाबतच नव्हे तर विधान परिषदेसाठी शिवसेनेतर्फे उमेदवार न दिल्याबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे. हुसेन दलवाई यांच्या रिक्त जागेवर मुझफ्फर हुसेन यांना काँग्रेसतर्फे तिकीट देण्यात आले. या निवडणुकीत शिवसेनेतर्फे उमेदवार न दिल्याने हुसेन यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभा न करण्याची शिवसेनेची ही तब्बल पाचवी वेळ असून ही नवी परंपरा तर शिवसेना सुरू करीत नाही ना असा प्रश्नही शिवसैनिकांमध्ये चर्चिला जात आहे.