आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज ठाकरेंनी केलेले आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास- नारायण राणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे हे जमिनी खरेदीत गुंतले असल्याचा आरोप करणारे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना राणे यांनी उत्तर दिले आहे. राज यांनी केलेले आरोप तथ्यहीन असून जर हे आरोप सिद्ध झाले तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ, असे आक्रमक उत्तर राणे यांनी दिले आहे.

राणे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सिंधुदुर्गात जमिनीची खरेदी नियमानुसार झाली आहे. यात कोणताही गैरव्यवहार नाही. तसेच मी जमिनीसाठी कोणालाही धमकी दिली नाही. तसेच आपल्या विरोधात अशी एकही तक्रार आलेली नाही. मग राज ठाकरे माझ्यावर कोणत्या आधारावर आरोप करीत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उद्योगमंत्री राणे यांनी राज यांना सल्ला देताना म्हटले की, राज यांनी योग्य व खरी माहिती घ्यावी व मग आरोप करावेत. याचबरोबर राज यांनी याबाबत आपल्याला फोन करुन माहिती विचारली असती तरी दिली असती.

राज ठाकरे यांनी शनिवारी खेडमधील सभेत नारायण राणेंवर ते जमिनी खरेदीत गुंतले असल्याचा व शेतक-यांना दमदाटी करुन त्या जमिनी मिळवत असल्याचा आरोप केला होता. त्याला राणे यांनी आता उत्तर दिले आहे.