आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासेमारी करू न दिल्याने सुरक्षा रक्षकाची हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पवई तलावात मासेमारी करण्यास विराेध केल्यामुळे दाेन तरुणांनी या तलावावरील ५० वर्षीय सुरक्षा रक्षकाचा भाेसकून खून केला. ही घटना साेमवारी रात्री घडली. साेहिब खान असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव अाहे.  
 
साेहिब व अाणखी दाेन सुरक्षा रक्षक पवई तलावाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात अाले अाहेत. साेमवारी रात्री एका छाेट्याशा बाेटीतून दाेन तरुण या तलावात मासेमारी करत हाेते. या सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तसेच हे तरुण वापरत असलेले जाळेही त्यांनी ताेडून टाकले. या प्रकाराचा राग अाल्यामुळे तबरेज खान व त्याच्या साथीदाराने साेहिब यांच्यावर चाकूने वार करून त्यांना तलावात फेकले. हा प्रकार पाहून इतर दाेन सुरक्षा रक्षक पळून गेले.  दरम्यान, अाराेपी तबरेज व सलीम या अाराेपींना अटक करण्यात अाली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...