आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीने तरुणावर केला बलात्काराचा आरोप, CCTV मध्ये समोर आले सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॅलिफोर्नियातील साउथर्न यूनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आणि मुंबईचा रहिवासी तरुण सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने बलात्काराच्या आरोपातून सहीसलामत बाहेर निघाला. तरुण मद्याच्या नशेत तर्रर्र झाल्याचे पाहून तरुणीने फायदा उठवण्याचा प्रयत्न केले होता. त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. स्वत:ची बाजू मांडण्यासाठी तरुणाने एक नाइट क्लबच्या व्हिडिओ फुटेज कोर्टात सादर केले होते.

काय आहे प्रकरण?
- मिळालेली माहिती अशी की, साउथर्न यूनिव्हर्सिटीचा विद्यार्थी अरमान प्रेमजी याच्यावर 19 वर्षीय तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता.
- तरुणीने अरमानच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. नंत पोलिसांनी त्याला अटकही केली होती.
- स्वत:ची बाजू मांडताना अरमानने कोर्टात एक नाइट क्लबचा सीसीटीव्ही फुटेज सादर केला होता. त्यात तरुणी अरमानसोबत बोलताना दिसत आहे. अरमानचा हात तिने हातात घेतल्याचे दिसत आहे.
- तरुणीच्या वकिलांनी आरोप केला होता की, अरमान याने तरुणीवर बलात्कार केला होता.
- अरमानने कोर्टात सांगितले की, तरुणीची त्याच्यासोबत इंटीमेट होण्याची इच्छा होती. तरुणीने स्वत: त्याच्या गळ्यात हात टाकले होते. नंतर तिचा अरमानला किस करण्याचाही इरादा होता.
- व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर कोर्टाने सांगितले की, पीडीत तरुणी अरमानसोबत स्वमर्जीने फिरत होती. ती अरमानला फसवत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. नंतर कोर्टाने अरमान याची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली.
    
पुढील स्लाइड्सवर पाहा... या घटनेशी संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...