आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CM पत्नी अमृता फडणवीस नव्या अवतारात, बॉलिवूड स्टार्ससोबत असा केला डान्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऋतिक आणि जॅकलीनसोबत अमृताने केला डान्स... - Divya Marathi
ऋतिक आणि जॅकलीनसोबत अमृताने केला डान्स...

मुंबई- ठाणे पोलिस मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉनमधील विजेत्यांना पुरस्कार देण्यासाठी सीएम देवेंद्र फडणवीसची पत्नी अमृता फडणवीससोबत अनेक फिल्मी सितारे उपस्थित होते. ज्यात अभिनेता ऋतिक रोशन, सुनील शेट्टी आणि अॅक्ट्रेस जॅकलीन फर्नांडिसचा समावेश होता. अमृताने मॅरेथॉन संपताच स्टार्ससोबत मंचावर जाऊन भरपूर एन्जॉय केला. रविवारी आयोजित केलेल्या या मॅरेथॉनचे काही निवडक फोटोज अमृताने बुधवारी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहेत. फोटोज सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहेत.....

 

- रविवारी शहरातील रेमंड मैदानात आयोजित केलेल्या या मॅरेथॉनचे आयोजन ठाणे पोलिस आयुक्तालयाद्वारे केले होते.
- मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन ठाणे पोलिस कमिश्नर परमबीर सिंह आणि फिल्म अभिनेता सुनील शेट्टी यांनी केले. 
- या स्पर्धेत 21 किलोमीटरच्या पुरुष वर्गात काशिनाथ दुधाडे आणि महिला वर्गात 21 किमी स्पर्धेत शोभा देसाई हिने बाजी मारली.
- मॅरेथॉनच्या विजेत्यांना पुरस्कार देताना अभिनेता ऋतिक रोशनने सांगितले की, पोलिस आपणा सर्वांना सुरक्षा देत असते.
- या कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीसने हिंदी फिल्मच्या गाण्यांवर डान्स सुद्धा केला. यावेळी त्यांना अॅक्ट्रेस जॅकलीन फर्नांडिस यांनी साथ दिली.
- फेसबुकवर पोस्ट केलेले अमृताचे हे फोटोज सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहेत. लोको तिच्या लुकच्या खूप कौतूक करत आहेत.

 

क्लासिकल सिंगर आहे अमृता-

 

- अमृता अॅक्सिस बॅंकेत व्हाईस प्रेसीडंट आहे. अमृता फडणवीस क्लासिकल सिंगर सुद्धा आहे. 
- अमृता नागपूरमधील प्रसिदध गायनॉकॉलिजस्ट डॉ. चारु रानडे आणि आय स्पेशालिस्ट डॉ. शरद रानडे यांची मुलगी आहे.
- 1979 मध्ये जन्मलेल्या अमृताचे लग्न 2005 मध्ये देवेंद्र फडणवीससोबत झाले. दोघांना दिविजा नावाची एक मुलगी आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, मॅरेथॉन दरम्यानचे अमृता फडणवीसचे फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...