आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसानंतर दिसले उद्धवस्त जीवन, या स्थितीत सापडले अनेकांचे मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका कारमध्ये वकिलाचा गुदमरुन मृत्यू झाला. - Divya Marathi
एका कारमध्ये वकिलाचा गुदमरुन मृत्यू झाला.
मुंबई- मुसळधार पावसाने मुंबईला झोडपल्यानंतर तेथील उद्धवस्त जीवनाचे चित्र आता खऱ्या अर्थाने समोर येत आहे. अनेक ठिकाणी पाणी ओसरल्यानंतर वाहून गेलेल्या गाडया आणि नागरिकांचे मृतदेह सापडत आहेत. प्रशासनाने मुंबई आणि ठाण्यात 14 नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. या पावसानंतर आता मुंबईकरांना रोगराईचा सामना करावा लागण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
 
मुंबईत 6 जणांचा मृत्यू
- मुसळधार पावसाने मुंबईत 6 जणांचा मृत्यू झाला. यात शहरातील प्रसिध्द डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा समावेश आहे.
- डॉक्टर दीपक अमरापूरकर हे मंगळवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते. एका व्यक्तीने त्यांना मॅनहोलमध्ये पडताना पाहिले होते. त्यानंतर तपास सुरु करण्यात आला होता. गुरुवारी त्यांचा मृतदेह वरळीत सापडला होता.
- मुलुंड येथील डॉ. एम. वैद्य हे देखील बेपत्ता आहेत. शीव परिसरात बुधवारी एका 30 वर्षीय वकिलाचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. 
- विक्रोळीत घर कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू झाला तर दहिसर आणि कांदिवलीत प्रतिक सुनील आणि ओमप्रकाश निर्मल हे वाहून गेले.
- गणपतीचे विसर्जन करताना रोहित कुमार या 17 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. 
 
ठाण्यात 7 जण गेले वाहून
- ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी 7 जण वाहून गेले. यातील 5 जणांचे मृतदेह सापडले आहेत.
- यात एक 12 वर्षाची मुलगी, 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, कोरम मॉल जवळून आपल्या वडिलांसमवेत गौरी जयस्वाल ही 12 वर्षाची मुलगी चालत जात होती. तिचा पाय घसरुन ती नाल्यात पडली आणि वाहून गेली.
- रामनगर येथील मीनू अठवाल (34) हा वेगाने वाहणाऱ्या नाल्यात पडला आणि वाहून गेला.
- कळवा येथे राहणाऱ्या रंजीता शेख (35) यांचा मृतदेह शांतीनगर येथील नाल्यात सापडला. वागळे इस्टेट येथील इंदिरा नगर परिसरातील शाहिद शेख (28) यांचा मृतदेह कोरम मॉल जवळ सापडला. ते नाल्यात वाहून गेले होते.
- धर्मवीरनगर येथील गंगाराम बालगुड़े (50) हे घरलगत नाल्यात वाहून चाललेला ड्रम वाचविण्याच्या प्रयत्नात वाहून गेले. त्यांचा मृतदेह बुधवारी आनंदनगर येथील नाल्यात सापडला.
- याशिवाय एका पुरुषाचा मृतदेह सापडला आहे पण त्याची ओळख पटू शकलेली नाही.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती....
बातम्या आणखी आहेत...