आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई: गुगल ट्रान्सलेट वापर करत रेल्वेने दिले सेफ्टी संदेश, आता अशी उडतेय खिल्ली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई रेल्वे स्टेशनवर लावलेले स्टीकर... - Divya Marathi
मुंबई रेल्वे स्टेशनवर लावलेले स्टीकर...

मुंबई- एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर बनलेल्या फुट ओवर ब्रिज (एफओबी) वर चेंगराचेंगरी झाल्याने 23 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. अशा घटना पुन्हा होऊ नये साठी वेस्टर्न रेल्वेने मुंबईतील अनेक स्टेशनवर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी संदेश देणारे हिंदी, इंग्लिश आणि मराठी भाषेत स्टीकरद्वारे लावले आहेत. मात्र, यातून एक चूक घडली आणि त्यामुळे सोशल मीडियात रेल्वेची जोरदार खिल्ली उडविली आहे. खरं तर इंग्लिशमधील संदेश गूगल ट्रान्सलेट करून मराठीत वापरले गेले आहे. ज्यामुळे त्याच्या अर्थाचा अनर्थ निघाला आहे. कुठे झाली रेल्वेची चूक.....

 

- सुरूवातीला वेस्टर्न रेल्वेने मुंबईतील सांताक्रूज, एलफिन्स्टन आणि गोरेगाव रेल्वे स्टेशनवर तीन भाषांत सेफ्टी स्टीकर लावली आहेत.
- यातील एका स्टीकरवर मराठीत लिहले आहे की, "कृपया लहान चेंडू घेऊ नका". याचा इंग्रजीतील अर्थ आहे, ‘please do not take short cuts’ ." 
- खरं तर वेस्टर्न रेल्वेला, "कृपया शार्ट कट घेऊन नका" असा संदेश द्यायचा होता. मात्र, मराठी भाषा तज्ज्ञांचे मार्गदर्शन न घेता गूगल ट्रान्सलेटचा आधार घेत भाषांतर केले आणि ते लावून दिले. ज्यामुळे त्याच्या अर्थाचा अनर्थ झाला.
- आणखी एक संदेश एलफिन्स्टन स्टेशनवरील एफओबीवर लावला आहे ज्यावर लिहले की, "कृपया एकतर बाजूला ठेवला" ज्याचा अर्थ आहे "कृपया एक तरफ रख दो." खरं तर रेल्वेला म्हणायचे आहे, "कृपया एका बाजूने चाला."
- आणखी एक संदेश लिहला आहे की, "कृपया एक पाऊल वगळू नाका" ज्याचा हिंदीत अर्थ आहे, "कृपया एक कदम नहीं छोड़ें" खरं तर रेल्वेला म्हणायचे आहे की, "कृपया एक ही पाऊल चुकीचे टाकू नका."
- आणखी एका ठिकाणी लिहले की, "कृप्या हन्द्रोही धरून ठेवा" ज्याचा हिंदीत अर्थ आहे,"कृपया हाथ में अपना हाथ रखें." खरं तर रेल्वेला म्हणायचे आहे की, "कृपया रेलिंगला हाताने धरून राहा."

 

रेल्वेने चूक केली मान्य-

 

- दरम्यान, रेल्वेची सोशल मिडियात खिल्ली उडायला लागल्यानंतर आमची चूक झाल्याचे तत्काळ मान्य केले. तसेच लवकरच नविन व शुद्ध भाषेतील स्टिकर लावले जातील असे सांगून वाद पेटण्यापूर्वीच त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

- मनसेसारख्या संघटनेचा दबाव आधीच रेल्वेवर आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ नविन स्टिकर लावायला सांगितले आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, रेल्वेने कसा घातला घोळ आणि कसा झाला अर्थाचा अनर्थ...

बातम्या आणखी आहेत...