आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 भाऊ-बहिणींसमवेत गेले नीताचे बालपण, पाहा लहानपण ते आतापर्यंतचे फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई-वडिलांच्या कुशीत नीता (डावीकडे, वर), भारतनाट्यम् करताना नीता (डावीकडे, खाली), नीताचा आताचा फोटो (उजवीकडे) - Divya Marathi
आई-वडिलांच्या कुशीत नीता (डावीकडे, वर), भारतनाट्यम् करताना नीता (डावीकडे, खाली), नीताचा आताचा फोटो (उजवीकडे)
मुंबई- भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींची पत्नी नीता अंबानींचा आज जन्मदिवस आहे. नीता अंबानी एका मिडल क्लास फॅमिलीतील आहेत. लहानपणी नीताचे नाव नयनतारा ठेवण्यात आले होते. ज्यानंतर ते छोटे करून 'नीता' असे केले. मुकेश अंबानीशी लग्न झाल्यानंतर आता हे कपल इंडियन बिजनेस वर्ल्डमधील सर्वात श्रीमंत कपल आहे. यानिमित्ताने आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नीता अंबानींचे लहानपणापासून ते आतापर्यंतचे फोटोग्राफ. अशी होती लग्नाआधी नीताची लाईफ...
 
- नीता दलाल अंबानीचा जन्म 1 नोव्हेंबर 1963 रोजी झाला. तिच्या वडिलांचे नाव रविंद्र भाई दलाल आणि आईचे नाव पूर्णिमा दलाल आहे.
- नीताने ग्रॅज्यूएशन कॉमर्समध्ये केले आहे. नीता अंबानीच्या बहिणीचे नाव ममता आहे, जी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकवते. तिने नीताप्रमाणेच भरतनाट्यम शिकले आहे.
 
असे झाले लग्न मुकेशसोबत लग्न-
 
- एकदा नीता अंबानी यांचा भरतनाट्यम परफॉर्मन्स पाहिल्यानंतर स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांनी आपला मुलगा मुकेश अंबानीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव नीताला दिला. 
- मुकेश आणि नीता अंबानीचे लग्न 8 मार्च 1985 रोजी झाले. लग्नावेळी मुकेश अंबानीचे वय 28 तर नीता अंबानींचे वय 22 वर्षे होते.
 
नीता अंबानी येथे आहे सक्रिय-
 
- नीता अंबानी मुंबई स्थित धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फाउंडर आणि चेयरमन आहे.  
- रिलायन्स फाउंडेशनमध्ये नीताची महत्त्वाची भूमिका आहे. तेथे त्याच सर्व काही हाताळतात. 
- नीता IPL क्रिकेट टीम मुंबई इंडियन्सची मालकिन सुद्धा आहे.
 
नीताचे संपूर्ण परिवार-
 
- अंबानी परिवाराचे नेटवर्थ सुमारे 20 अब्ज डॉलर आहे. मुकेश आणि नीता अंबानीला तीन मुले आहेत. आकाश, अनंत आणि ईशा अंबानी. आकाश आणि ईशा आपल्या पित्याच्या व्यवसायात लक्ष घालतात. ईशा अंबानी आपला भाऊ आकाश सोबत रिलायन्स जिओ प्रोजेक्ट पाहत आहे. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, नीता अंबानीचे लहानपणापासूनचे आतापर्यंतचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...