आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत जगातील सर्वात खतरनाक सेल्फी, एका फोटोसाठी घातला जातोय जीव धोक्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील युवकांनी अहमदनगर जिल्ह्यात हा सेल्फी घेतला आहे. - Divya Marathi
पुण्यातील युवकांनी अहमदनगर जिल्ह्यात हा सेल्फी घेतला आहे.
मुंबई- सेल्फीच्या वेडापायी नागपूरमध्ये 8 युवकांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर आता हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सेल्फी घेताना घडलेली छोटीशी चुकही अनेकदा जीवावर बेतु शकते याचे भानही अनेकांना नसते. राज्यातही अशी अनेक धोकादायक स्पॉट आहेत. या ठिकाणीही जीव धोक्यात घालुन सेल्फी काढल्या जातात.

दोन वर्षात झालाय 76 लोकांचा मृत्यू
- परदेशात असलेले हे सेल्फी वेड हळुहळु भारतातही वाढतच चालले आहे. आपल्या सेल्फीला जास्तीत जास्त लाईक्स मिळाव्यात यासाठी अनेक जण जीवही धोक्यात घालत आहेत.
- मार्च 2014 ते सप्टेंबर 2016 या कालावधीत भारतात जवळपास 76 जणांनी सेल्फीच्या नादात आपला जीव गमावलाय. जगभरात याच कालावधीत सेल्फीच्या नादात 127 जणांचा मृत्यू झालाय.
- अहमदनगर जिल्ह्यातील रतनगडावर 9 जणांनी 30 जानेवारी 2016 रोजी ट्रॅकिग करताना काढलेला सेल्फी हा अतिशय धोकादायक होता. प्रतिक खांडेकरने हा सेल्फी काढलाय.
- या सेल्फीत प्रतिक सोबत त्याचे 8 मित्र एका दरीच्या कडेला पाय सोडून बसले आहेत. प्रतिकच्या म्हणण्यानुसार हा सगळ्यात रोमांचक सेल्फी आहे.
- सेल्फीमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरातील 16 भागात नो-सेल्फी झोन बनवले आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...