मिसेस आठवलेंना मिळणार मंत्रिपद ? रिपाइंडून शिफारस केली जाणार
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
मुंबई - रिपाइं अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांचे लाल दिव्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. मात्र पद आठवले यांना नव्हे, तर त्यांच्या ‘गृहमंत्री’ सीमा यांच्या नावाची पक्षाकडून शिफारस केली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाचा दोन महिन्यांत विस्तार होत असून, रिपाइंच्या कोट्यातील मंत्रिपदासाठी सीमा यांच्या नावावर पक्षात एकमत झाल्याचे समजते. भाजपने आधी आठवलेंना मंत्रिपदाची ऑफर दिली होती, मात्र खासदारकी सोडण्याची अट होती. त्यास त्यांनी नकार दिला.