आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभव होताच मनसेने सेल्फी पॉइंट गुंडाळला, संदीप देशपांडे यांच्या पत्नीच्या पराभवाचे पडसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू  ठरलेला दादर शिवाजी पार्कातील ‘सेल्फी पॉइंट’ बुधवारी उतरवण्यात आला. ‘मनसे’चे मावळते नगरसेवक संदीप देशपांडे यांनी हा सेल्फी पॉइंट केला होता. सेल्फी पॉइंटच्या  देखभालीसाठी सीएसआर फंड उपलब्ध होत नसल्याने तो बंद केल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले. मात्र, महापालिका निवडणुकीत दादर वाॅर्डातून ‘मनसे’चा पराभव झाल्याने सेल्फी पॉइंट बंद केल्याची चर्चा आहे.    
 
दादर खरे तर शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेच्या ताब्यातील हा गड २०१२ च्या निवडणुकीत ‘मनसे’ने खेचून आणला होता. ‘मनसे’चे नगरसेवक संदीप देशपांडे येथून निवडून आले. राज ठाकरे यांचे घर याच वाॅर्डात आहे. त्यामुळे शिवाजी पार्कात मनसेने अनेक विकासकामे केली होती. रेन वाॅटर हार्वेस्टिंग, सोलार लाइट्स आणि सेल्फी पॉइंट ही त्यातली उल्लेखनीय कामे. या वेळी हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना ‘मनसे’ने उमेदवारी दिली होती. 

मात्र, त्यांच्या विरोधात शिवसेनेने माजी महापौर विशाखा राऊत यांना उभे केले. या लढतीकडे अवघ्या मुंबईचे लक्ष वेधले होते. मात्र, दादरकरांनी या वेळी शिवसेना उमेदवाराला येथून विजयी केले. त्यामुळे ‘मनसे’ला मोठा हादरा बसला आहे.  

तरुणाईचा हिरमोड 
दादरचा बालेकिल्ला राखण्यासाठी ‘मनसे’ने ताकद  पणाला लावली होती. दादर येथील सेल्फी पॉइंट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत चालला होता. सेल्फीसाठी तरुणाईची येथे गर्दी असायची. मुंबईतला हा पहिला सेल्फी पॉइट समजला जात  होता. अखेर ‘मनसे’ने सेल्फी पॉइंट बंद केल्याने तरुणाईचा हिरमोड झाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...