आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेक इन इंडिया’ची बनावट लेबल लावून घातक चिनी फटाक्यांची सर्रास विक्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चिनी फटाक्यांमध्ये वापरण्यात येणारी घातक रसायने हवा अाणि ध्वनी प्रदूषणात माेठ्या प्रमाणावर भर टाकतात, तसेच भारतीय फटाक्यांपेक्षा त्यात रसायनांची मात्रा जास्त असल्यामुळे अशा फटाक्यांवर १९९२ पासून बंदी घालण्यात आलेली आहे. तरीही दरवर्षी छुप्या मार्गाने तब्बल दीड हजार काेटी रुपयांचे फटाके दरवर्षी अापल्या बाजारपेठेत विकले जातात. ‘मेक इन इंडिया’चे बनावट लेबल लावून त्याची सर्रास विक्रीही केली जाते.  या फटाक्यांमध्ये सल्फर अाणि पाेटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने दमा, बहिरेपणा, अंधत्व असे गंभीर अाजार उद्भवण्याचा धाेका असताे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सहसंचालक डाॅ. विद्यानंद माेटघरे यांनी सांगितले की, ‘मुंबईत राष्ट्रीय केमिकल्स अँॅड फर्टिलायझर्सच्या मैदानावर बाजारातल्या विविध प्रकारच्या २५ प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेतली असता त्यामध्ये सुतळी बाॅम्ब अाणि दहा हजारांची फटाक्यांची माळ यामध्ये ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण १२५ डेसिबल मानकापेक्षा जास्त अाढळून अाले. त्याचप्रमाणे या वर्षी भुईचक्र, सापाच्या गाेळ्या अाणि १० हजारांच्या माळा यामध्ये हवेतील प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याचे अाढळून अाले. फटाक्यांमध्ये वापरण्यात अालेल्या रसायनांचा चाचणी अहवाल अद्याप यायचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

मागील वर्षी दिवाळीत हवेतील धूलिकणांमध्ये नायट्राेजन अाणि सल्फर डायाॅक्साइडचे प्रमाण जास्त दिसून अाले. िहवाळ्यामध्ये धूलिकण निघून न जाता त्यांचा एक थर बनताे. मागील वर्षी दिवाळीत थंडीचे वातावरण असल्याने हे प्रमाण जास्त हाेते. परंतु राज्यात अद्यापही पावसाळ्याचेच वातावरण असल्याने यंदाच्या दिवाळीत ही समस्या जाणवणार नाही,’ असे ते म्हणाले.

चिनी फटाके : स्वस्तात मिळणाऱ्या चिनी फटाक्यांमध्ये सल्फर अाणि पाेटॅशियम क्लाेरेटचे प्रमाण जास्त असल्याने माेठ्या प्रमाणावर प्रदूषण हाेते. सल्फरमुळे टाॅक्झिक अाॅक्साइड निर्माण हाेऊन त्यामुळे डाेळे चुरचुरणे, श्वासोच्छ्वास करण्यास त्रास हाेताे. पाेटॅशियम क्लाेरेटमुळे त्वचेला खाज सुटणे तसेच श्वसनास अडचण निर्माण हाेते. हा त्रास दीर्घकाळ टिकल्यास दमाविकार वाढून किडनी तसेच मज्जासंस्थेवर परिणाम हाेऊ शकताे, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

फटाक्यांमुळे हाेणारे विकार
दमा, खाेकला, लहान मुलांना त्वचाराेग, बहिरेपणा, डाेळ्यांना जखम किंवा अंधत्व, चिडचिड, अावाजामुळे ताण, भीती, मज्जासंस्थेचे विकार दिवाळीच्या काळात हाेतात.
बातम्या आणखी आहेत...