आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Semi Government Employees Also Has To Declare Property

निमशासकीय कर्मचा-यांनाही संपत्ती जाहीर करणे सक्तीचे, मनपा, झेडपी कर्मचा-यांचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देवेंद्र फडणवीस सरकारने शुक्रवारी घेतलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारी अधिकारी-कर्मचा-यांप्रमाणेच नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिकांसह निमशासकीय कर्मचा-यांना आपली मालमत्ता जाहीर करावी लागेल.
याआधी मालमत्तेच्या नियमातून निमशासकीय संस्था, पंचायतराज संस्था, नगर परिषदा, जिल्हा परिषद, मनपा, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, मंडळांतील कर्मचा-यांना वगळले होते. मात्र सर्व संस्थांवर सरकारचे नियंत्रण असणे आवश्यक असल्याने राज्य सरकारने महानगरपालिका, नगर परिषदांसह सिडको, एमएमआरडीए मधील अधिका-यांना दरवर्षी ३१ मेपर्यंत मालमत्तेची माहिती विभागप्रमुखांना सादर करणे बंधनकारक केले. सध्या शासकीय अधिकारी १ जानेवारीपर्यंत ही माहिती सादर करतात.

वेबसाइटच्या माध्यमातून अधिका-यांना माहिती जाहीर करणे बंधनकारक केले पाहिजे. तसे झाले तरच फरक पडेल, असे परखड मत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.

अशी द्यावी लागेल माहिती
निमशासकीय कर्मचा-यांना आपली मालमत्ता दरवर्षी विभागप्रमुखाला सादर करावी लागेल. मात्र ती प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात नसेल. स्थावर मालमत्ता कुठे असून जंगम मालमत्ता किती आहे, याची माहिती संबंधितांना आपल्या स्वाक्षरीसह तपशीलवार द्यावी लागेल.