आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sena Chief Invites CM Devendra Fadnavis For Dinner

‘मातोश्री’वर भोजनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वांद्रेपूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सायंकाळी वांद्रे परिसरात प्रचारसभा घेतली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना ‘मातोश्री’वर भोजनाचे निमंत्रण दिले त्यांनीही स्वीकारले. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून फडणवीस हे प्रथमच ‘मातोश्री’वर गेले होते.

भूसंपादन कायद्याला शिवसेनेचा विरोध असूनही राज्यात हा कायदा लागू केल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये धुसफूस आहे. विधिमंडळातही शिवसेनेच्या आमदारांनी सोमवारी या कायद्याबाबत सरकारला जाब विचारला. या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’वरील ‘लंच डिप्लोमसी’मध्ये उद्धव ठाकरे फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.