आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीतल म्हात्रेप्रकरणी शिवसेना नव्हे मनसे सरसावली, पालिकेसमोर आज आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रेप्रकरणी आता शिवसेना नव्हे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरसावली आहे. शीतल म्हात्रे या पालिकेतील महिला प्रतिनिधीला न्याय मिळावा म्हणून मनसे शिवसेनेच्या विरोधात आज मुंबई महापालिकेसमोर आंदोलन करणार आहे.
शिवसेनेला आपल्या लोकप्रतिनिधीकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे दाखवून देण्यासाठी मनसेचा हा प्रयत्न राहणार आहे. दरम्यान, आम्ही या प्रकरणात लक्ष घातले असून, आमचे वरिष्ठ नेते याबाबत योग्य ती पावले उचलत आहेत. राष्ट्रीय महिला आयोगासह कोणीही नाक खुपसू नये व चिंता करू नये असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.