आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sena Leader Ramdas Kadam Unhappy In Party? But Party Behind Him

शिवसेना कदापी सोडणार नाही- रामदास कदम, उद्धव यांच्याकडून भाईंची पाठराखण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेसाठीच जगत आलो व शिवसेनेसाठीच मरेन. पण शिवसेना कदापी सोडणार नाही असे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी स्पष्ट केले आहे. होय, पक्षातील काही लोक माझ्याबाबत संभ्रम निर्माण करीत आहेत त्यामुळे आपण अस्वस्थ आहोत अशी कबुलीही कदम यांनी दिली. दरम्यान, कदम यांच्या पाठीशी पक्षनेतृत्त्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. कदम यांना पक्षाचा प्रचार करण्यास बंदी घातली नाही. हे वृत्त दिशाभूल करणारे असून कदम शिवसेनेच्या प्रचारासाठी कदम सभा घेणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
शिवसेनेचे नेते रामदास कदम पक्षनेतृत्त्वावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. पण खुद्द रामदास कदम यांनी आपली नाराजी पक्षनेतृत्त्वावर नसून पक्षातील काही लोकांवर असल्याचे म्हटले आहे. आपल्याविरोधात पक्ष आणि पक्षाबाहेर षड्‌यंत्र होत आहे, पाच वर्षात पक्ष आणि पक्षाबाहेरील या षड्‌यंत्रामुळे हैराण झालो आहे असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना कदम यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
कदम म्हणाले की, काहीजण आपल्यात आणि शिवसेनेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या विधानसभेवेळी गुहागरमध्ये पक्षातल्याच नेत्यांनी पाय ओढले, असा आरोप त्यांनी अनंत गीतेंवर नाव न घेता केला. गुहागर मध्ये विनय नातूंना कोणी उभे केल? माझ्या प्रचाराच्या आड नातूंचा प्रचार झाला? कुणाच्या वाड्यावर कुठे बैठका झाल्या.? मुंबईतून माझ्याविरोधात कार्यकर्ते कसे आणले गेले? हे सर्व माहिती आहे. तसेच माझ्यात आणि शिवसैनिकात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. जर कोणात हिंमत असेल तर समोरून या पण राजकीय भवितव्याशी खेळू नका असे सांगत कदम यांनी गिते व पक्षातंर्गत विरोधकांना आव्हान दिले.
पुढे वाचा, कदम यांच्या पाठीशी उद्धव ठाकरे, काय म्हणाले ते ...