आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senate Number Increases, New Universities Act In Winter Session

सिनेटची संख्या वाढणार, हिवाळी अधिवेशनात नवा विद्यापीठ कायदा आणण्याची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात बदल करून नवीन विद्यापीठ कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात आणला जाणार आहे. नव्या कायद्याने सिनेट सदस्यांची संख्या कमी नाही, तर वाढेलच, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले.

राज्यातील विद्यापीठांमध्ये सिनेट सदस्य ही संस्था बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला असल्यासंदर्भात डॉ. सुधीर तांबे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. सिनेट पद रद्द करून सरकार ‘सोल’ ही नवी पद्धत आणत आहे. यामुळे सिनेटला असलेल्या अधिकाराच्या मर्यादांवर बंधन येईल. तसेच सिनेटची पदे कमी केल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील, याकडे तांबे यांनी लक्ष वेधले. त्यावर तावडे म्हणाले, ‘येत्या हिवाळी अधिवेशनात नवा विद्यापीठ कायदा आणला जाणार आहे. त्यात काही सूचना आणि सुधारणा असतील, त्या आपण मांडाव्यात. सरकार डॉ. अरुण निगवेकर यांनी सिनेटबाबत दिलेल्या अहवालाच्या शिफारशींशी सहमत नाही. कुलगुरूंनी सिनेटपुढे वर्षातून किमान तीन वेळा तरी गेले पाहिजे, असे सरकारचे मत आहे. असे बंधन नव्या कायद्यात असेल.