आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Actor Dara Singh Is No More For Brian Ham Rage

रुस्तम-ए-हिंद, ज्येष्ठ अभिनेते दारा सिंग यांचे निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: कुस्तीवीर, ज्येष्‍ठ अभिनेते दारा सिंग पंचतत्वात विलीन झाले. गुरुवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत दारा सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्‍कार केले गेले. पुत्र विंदू सिंग यांनी मुखाग्नी दिला. दारा सिंग यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडसह राजकीय, सामजिक क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्‍ठ अभिनेते दारा सिंग यांचे गुरुवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा विंदू सिंग यांनी दिली.
प्रकृती खालावल्यामुळे त्यांना 7 जुलैला मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना व्हॅंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. बुधवारी त्यांना ब्रेन हॅमरेजचा धक्का बसला. त्यानंतर त्यांना बुधवारी रात्री रुग्णालयातून घरी नेण्यात आले होते.
दारा सिंग यांना रुस्तम-ए-हिंद पुरस्काराने सन्मानित करण्‍यात आले होते. दूरचित्रवाणीवरील गाजलेल्या रामायण मालिकेतील दारा सिंग यांची हनुमानाची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. 'जब वुई मेट' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 'कल हो ना हो' या चित्रपटातही त्यांनी अभिनय केला होता. अनेक हिंदी- पंजाबी चित्रपटात त्यांनी काम केले होते.
दारासिंग यांचा जीवनपट
कुस्तीवीर म्हणून जनमानसात ओळखले जाणारे दारा सिंग यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1928 साली अमृतसरच्या धरमोचकमध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्यांना कुस्तीची आवड होती. ‍ते एक प्रसिद्ध कुस्तीपटू म्हणून ते नावाजले गेले. रुबाबदार शरीरयष्टी असलेल्या दारा सिंग यांनी 1962 मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अनेक दिग्दर्शकांनी त्यांची बलदंड शरीरयष्टी पाहून त्यांच्या व्यक्तीमत्वाला साजेशा भूमिका दिल्या होत्या.
100 हून अधिक चित्रपटांत दारा सिंग यांनी अभिनय केला होता. 1978 साली दारासिंग यांना रुस्तम-ए-हिंद या किताबाने गौरवण्यात आले होते. 2003 साली ते राज्यसभेचे खासदारही झाले.
PHOTOS : सिनेअभिनेत्यांनी दिला दारा सिंग यांना अखेरचा निरोप...
PHOTOS : दारा सिंग यांचा जीवनप्रवास
VIDEO - दारा सिंग यांचे आठवणीतील काही क्षण
PHOTOS : दारा सिंग यांच्या खाजगी आयुष्यावर एक नजर