आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: आर पार’, ‘बरसात की रात\' ची अभिनेत्री श्यामा यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडची जेष्ठ अभिनेत्री श्यामा (वय 82) यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. श्यामा यांचे खरे नाव खुर्शीद अख्तर असे होते. दिग्दर्शक विजय भट्ट यांनी ते नाव बदलून श्यामा हे नाव ठवले. श्यामा यांनी सुमारे १७५ चित्रपटांमध्ये काम केले होते. 1950  आणि 1960 च्या दशकात श्यामा या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. ‘आर पार’, ‘बरसात की रात’ आणि ‘तराना’ या चित्रपटांसाठी श्यामा यांना आजही ओळखले जाते.  
 
श्यामा यांचा जन्म 7 जून 1935 रोजी लाहोर येथे झाला होता. 1953 साली त्यांनी दिग्दर्शक फली मिस्त्री यांच्याशी लग्न केले. श्यामा यांनी सावन भादो, दिल दिया दर्द लिया, मिलन, शारदा या चित्रपटातही अभिनय केला होता. शारदा चित्रपटासाठी त्यांना सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता

श्यामा यांची गाणी 'ऐ दिल मुझे बता दे', 'ओ चांद जहां वो जाए', 'ऐ लो मैं हारी पिया', 'देखो वो चांद छुप के करता है क्या इशारे', 'जा रे कारे बदला' खूप प्रसिद्ध झाली होती. जुन्या काळातील आणखी एक अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली आहे. मंगळवारी दुपारी मरिन लाईन्स येथे अंत्यविधी झाला. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, श्यामा याचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...