आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Artist Get Stipend In Next Year : Ajit Pawar

वृद्ध कलावंतांच्या मानधनात पुढील वर्षापासून वाढ करणार- अजित पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वृद्ध कलावंतांना देण्यात येणा-या मानधनात पुढील अर्थिक वर्षापासून वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केली. तसेच औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि पुणे येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाची विभागीय कार्यालये सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले.
सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. पी.एस. मीना, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर.डी. शिंदे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अशोक हांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

बारामती येथे झालेल्या 93 व्या नाट्यसंमेलनातील ठरावांबाबतही बैठकीत चर्चा झाली. नव्या निर्णयानुसार अ वर्गातील कलावंतांना वर्षाला 18 हजार रुपये, ब वर्ग 5 हजार रुपये तर क वर्ग कलावंताला 12 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. पात्र कलाकारांची निवड करणा-या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा समितीमध्ये यापुढे नाट्य परिषदेने सुचवलेले दोन सदस्यही असणार आहेत.

पुण्याजवळ कलाश्रम
वृद्ध कलाकारांसाठी पुण्याजवळ कलाश्रम उभारला जाईल. यासाठी शासनाकडून एकरकमी निधी दिला जाणार आहे. येथे निवासी व वैद्यकीय सुविधा दिल्या जातील. नाट्य प्रयोगांसाठी संस्थांना वर्षभरासाठी एकदाच परवाने देण्याबाबत महसूल आणि गृह विभाग संयुक्तपणे अहवाल सादर करणार आहे. त्यानुसार आर्थिक वर्षासाठी असे परवाने देण्यासाठी एक खिडकी योजना राबवली जाणार असल्याचे अजित पवार म्हणाले.