आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Senior Bjp Leader Khadse Tears In His Eyes On Birthday

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढदिवसाच्या समारंभात नाथाभाऊ गहिवरले; \'भावी मुख्यमंत्री\'च्या उल्लेखाने समर्थक सुखावले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- एकनाथ खडसे यांचा मंगळवारी वाढदिवस होता. यानिमित्त केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हितगूज करताना दानवे, खडसे व खासदार एटीनाना पाटील)
जळगाव- गेल्या 35-40 वर्षांपासून राजकारणात खूप संघर्ष केला; परंतु सव्वा वर्षापूर्वी तरुण मुलगा गेला. त्यानंतर संकटांची मालिकाच सुरू झाली. आजारपणाशी लढलो त्या वेळी खरे आयुष्य उमगले. गेल्या सव्वा वर्षात मी जे सहन केलं, भोगलं सोसलं ते माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्या कानावर घालण्यासाठी मी या कार्यक्रमाला आलो. खरे प्रेम करणारे नि:स्वार्थी लोक दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यासाठी पुढे आले, तर दुसरीकडे ज्यांना मी घडवलं, मोठं केलं, पदं दिली त्यांनीच माझ्या मरणाची वाट पाहिली; अफवा पसरवल्या. हा प्रसंग आयुष्यातील सर्वाधिक यातनादायी होता असे भावनिक उद्गार भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काढले.
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणतर्फे खडसे यांचा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना खडसेंचा कंठ दाटून आला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे एक खंदे व्यक्तिमत्त्व आहे. पक्षाविषयी व नेत्यांबाबत त्यांनी नेहमीच निष्ठा ठेवली. खडसे यांचा मंगळवारी वाढदिवस होता. गेल्या वर्षी त्यांचा मुलगा निखील गेला. त्यानंतर नाथाभाऊंना पायाच्या आजाराने गाठले. याच काळात मुंडे यांच्यासारखा खंबीर पाठीराखा निघून गेला. त्यामुळे खडसे खचले होते, मात्र, आता ते आजारपणातून बाहेर आले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी वाढदिवसानिमित्त मोठे प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला. तसेच सत्कार समारंभात भावी मुख्यमंत्री म्हणून घोषणा देण्यात आल्या.
हा संदर्भ घेत त्यांचा सत्कार करण्यासाठी आलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही खडसेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून थेट उल्लेख केला. त्यानंतर बोलताना खडसे भावनावश झाले होते. यावेळी मंत्री दानवेंसह खासदार ए.टी.पाटील, रक्षा खडसे, डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी खासदार हरिभाऊ जावळे, एम.के.पाटील, वाय.जी.महाजन, आमदार चिमणराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, स्मिता वाघ, उदय वाघ, रोहिणी खडसे, वाडीलाल राठोड यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे वाचा, हळवे नाथाभाऊ आणखी काय म्हणाले....
रावसाहेब दानवेंच्या घोषणेवर नाथाभाऊंचे समर्थक कसे सुखावले...